nanded saam tv
महाराष्ट्र

Crime : अंध दाम्पत्यास अराेहीच्या रुपानं मिळालेले डोळे, जगण्याची उमेद संपली; चुलत्यानं केला तिचा खून

अंध दाम्पत्याला मिळालेले डोळे आणि जगण्याची उमेद पुन्हा हिरावली गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संतोष जोशी

Nanded Crime News : नांदेड शहारात काकाने अंगणात खेळत असलेल्या पुतणीचं अपहरण करुन तिचा खुन केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी चिमुकलीस नदीत फेकुन दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या खळबळजनक घटनेनं नांदेड हादरुन गेलं. दरम्यान व्यसनाधिन असलेल्या काकानं पुतणीच्या कानातील साेन्याची रिंग चाेरल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

नांदेड शहरातील तेहरा नगरातील सहा वर्षाची चिमुरडी अरोही अंगणात खेळत हाेती. तिचे मंगळवारी अज्ञातानं अपहरण केल्याची तक्रार तिचे अंध वडील अंकुश हट्टेकर, आई शितल हट्टेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नाेंदवली हाेती.

पाेलिसांनी सखाेल माहिती घेतल्यानंतर या प्रकरणी संशयावरून अराेहीचे काका संतोष हट्टेकर यास ताब्यात घेतले. त्यानंतर सोडूनही दिले. शुक्रवारी आरोहीचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात सापडला. मुलीचा खुन झाल्याचे कळताच अंध असलेल्या हट्टेकर दाम्पत्यावर दुखाःचा डोंगर कोसळला.

त्यानंतर पुन्हा पोलिसांनी (police) अराेहीच्या काकास ताब्यात घेतलं. त्याला पाेलिसी खाक्या दाखविताच ताे घाबरला आणि त्याने पाेलिसांनी काही माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी त्यास अटक (arrest) केली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अराेहीचं काका हा नशा करणारा आहे. त्याने अरोहीचं अपहरण करुन तिच्या कानातले सोन्याचे रिंग काढून घेऊन तिचा खुन केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला गोदावरी नदीत फेकुन दिले.

या प्रकरणी त्याच्या विराेधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अरोहीच्या रुपानं अंध दाम्पत्याला मिळालेले डोळे आणि जगण्याची उमेद पुन्हा हिरावली गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT