Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२५, राजधानी दिल्लीमध्ये कार ब्लास्ट अपडेट, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

शुल्ल कारणावरून वाकडमध्ये व्यापारी तरुणाचा राडा

शुल्लक कारणावरून वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील ताथवडे परिसरामध्ये व्यापारी तरुणांनी राडा घातला आहे. काल रात्री उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या ताथवडे येथील सम्राट मेडिकल समोर एका व्यापारी तरुणांने मोठ्या प्रमाणात आरडाओरड करत राडा घातला आहे. व्यापारी तरुण आरडाओरडा करत राडा घालत असतानाचा विडियो त्या परिसरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे.

चित्रा वाघ यांना शिरूर कासार न्यायालयाने काढले वॉरंट, महेबुब शेख यांचे वकील कांबळे यांची माहिती.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणात अब्रू नुकसानीचा दावा केलेला होता. या प्रकरणात चित्रा वाघ यांना वारंवार समन्स पाठवून देखील हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना शिरूर कासार न्यायालयाने आज वॉरंट काढले आहे अशी माहिती शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिली आहे.

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर उपजिल्हा रुग्णालयाचे रेफर टू बुलढाणा असे नामकरण करून ठाकरे यांच्या शिवसेनेनं अनोखे आंदोलन केलेय .. या रुग्णालयातील कर्मचारी ,डॉक्टरा कडून रुग्णालयात आलेल्या रुग्णांना चुकीची वागणूक दिल्या जाते, रुग्णालयात डॉक्टर वेळेवर हजर राहत नाही, रुग्णांना कोणत्याही सुविधा मिळत नाही, तसेच डिलेव्हरी पेशंट, किरकोळ तपासणी करता सुद्धा बुलढाण्याला रेफर करण्याची पद्धत आहे, ही पद्धत बंद व्हावी, यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन गजानन ठोसर यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण "रेफर टू बुलढाणा रुग्णालय "असे करत फित कापून उद्घाटन केले.. तसेच पुढील आठ दिवसांत रुग्णालयाची परीस्थिती न सुधारल्यास तोडफोड करून रुग्णालयाला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला..

मोठा उलटफेर, ८ दिवसात भाजपची साथ सोडून ठाकरेंकडे परतला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. नुकतेच भाजपात प्रवेश केलेले अविनाश पाटील यांनी १५ दिवसांतच भाजप सोडत पुन्हा स्वगृही उद्धवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर लागलीच त्यांना उद्धवसेनेने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. उद्धवसेनेचे अंबादास दानवे यांचे अत्यंत विश्वासू अविनाश पाटील यांनी २८ ऑक्टोबर रोजी आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपकडून त्यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा शब्द दिल्याचे बोलले जात होते; मात्र ऐन वेळी भाजप आपला उमेदवार बदलणार असल्याचे समजताच अविनाश पाटील यांनी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पुन्हा उद्धवसेनेत प्रवेश केला.

अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वाटप करा, आमदार तानाजी सावंत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडले असताना अनुदान वाटपास विलंब होत आहे.अनुदान वाटपासाठी आवश्यक असलेली कामे पुर्ण करुन शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वाटप करण्याची मागणी आमदार तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलीय.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपास प्रशासन स्तरावरुन विलंब होत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधुन होत आहे.त्यामुळे अनुदान तातडीने वाटप करावे व एकही शेतकरी अनुदानापासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अस ही सावंत यांनी म्हटलय.

अति उच्चदाब विद्युत तारेचा धक्का लागल्याने कामगाराचा मृत्यू..देहूरोड येथील घटना....

देहूरोड शहरातील महावितरणच्या केंद्रीय विभागाच्या डेपो मध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणारा कर्मचारी संजीव कुमार चौगुले याला विजेचे काम करत असताना विद्युत तारे जवळ अतिउच्च विद्युत वाहिनी तारेचा स्पर्श होताच तो जमीनीवर कोसळला. घटनेनंतर तात्काळ त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या संजीव कुमार यास देहूरोड शहरातील आधार हॉस्पिटल या ठिकाणी उपचारा करीता दाखल केले परंतु उपचारापूर्वीच संजीव चा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी घोषित केले संबंधित घटनेबाबत देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत....

DHULE धुळ्यात थंडीचा जोर कायम, वाढत्या थंडीचा परिणाम शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर

धुळ्यात कडाक्याच्या थंडीचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे, 8.9°c अंश सेल्सिअस तापमानाची धुळ्यात नोंद करण्यात आली आहे, या हड गोठवणाऱ्या थंडीचा परिणाम शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर होत असल्याचे दिसून येत असून, थंडीचा जोर आणखीन वाढण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आल्याने शाळा अर्धा तास उशिरा भरविण्याची मागणी पालकांतर्फे केली जात आहे,

धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे, आणि थंडीला आता सुरुवात झालेली असून पुढील काही दिवसात थंडीचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे, त्यामुळे या वाढत्या थंडीचा परिणाम सकाळी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी अर्धा तास उशिरा शाळा भरविण्यात यावी अशी मागणी पालकांतर्फे जोर धरून आहे,

धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूकीच्या रिंगणात आम आदमी पार्टीची इंट्री

धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेच्या निवडणूकीचा बिगुल वाजला असुन या निवडणुकीत आम आदमी पार्टी देखील इंट्री करत आहे.जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद निवडणूका आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे यांनी केलीय.अपक्ष उमेदवार,छोटे घटक पक्ष, सामाजीक संघटनांच्या प्रतिनिधींना आम्ही सोबत घेणार आहोत जिल्ह्यात जे गलिच्छ राजकारण चालु आहे याला पर्याय म्हणून आम आदमी पार्टी निवडणूका लढवणार आहे आमचा उमेदवार गुन्हेगार,ठेकेदार नसणार आहे अस माकोडे यांनी सांगितले.

धुळ्यात कडाक्याच्या थंडीचा जोर कायम

8.9°c अंश सेल्सिअस तापमानाची धुळ्यात नोंद

या हड गोठवणाऱ्या थंडीचा परिणाम शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर

थंडीचा जोर आणखीन वाढण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आल्याने पालकांची शाळा अर्धा तास उशिरा भरविण्याची मागणी

धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला

मुंबई गोवा महामार्गासह ग्रामीण भागात सर्वत्र धुक्याची चादर

अवकाळी पावसाने पुर्ण पणे विश्रांती घेतल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दाट धुके पडल्याचे दिसून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह मुंबई गोवा महामार्गावर धुके पाहायला मिळाले. मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून आज सर्वत्र धुके पडल्याचे दिसून आले.

जळगाव पालिका निवडणूक रणधुमाळी जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी केवळ सहा अर्ज दाखल

जळगाव पालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बुधवारी तिसऱ्या दिवशी सहा अर्ज दाखल झाले आहेत. मात्र ते कोणत्या पदासाठी याची माहिती जिल्हा प्रशासन देऊ शकले नाही. ऑनलाइन ११५ अर्ज आले आहेत. तेही कोणत्या पदासाठी याचीही माहिती नाही. निवडणूक आयोगाकडून आलेल्या विवरणानुसार माहिती देत असल्याचे सांगण्यात आले.अमळनेरला पाच तर पाचोरा येथे एक अर्ज असे एकूण सहा अर्ज ऑफलाइन दाखल झाले आहेत. मंगळवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी वरणगाव येथे एक अर्ज दाखल झाला. तर नगरसेवक पदासाठी भुसावळ, अमळनेर, पाचोरा येथे प्रत्येक एक अर्ज दाखल झाले होते. पहिल्या दिवशी सोमवारी नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. तर अमळनेर पालिकेत नगरसेवकपदासाठी एक अर्ज दाखल झाला होता. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

पै. विजय चौधरी, ACP यांची ‘हिंदकेसरी २०२५-२६' कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

भारतीय शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य भारतीय कुस्ती संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रीय कुस्ती संकुल, वडकी (पुणे) येथे पार पडलेल्या हिंदकेसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत नवी मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त तसेच सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेता आणि जागतिक पोलीस सुवर्णपदक विजेता पैलवान विजय चौधरी यांनी दमदार व ऐतिहासिक खेळी सादर करत हिंदकेसरी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

येणाऱ्या १५ ते २० जानेवारी २०२६ रोजी सातारा जिल्हा येथे होणाऱ्या हिंद केसरी स्पर्धेसाठी चौधरी यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. निवड चाचणीदरम्यान चौधरी यांनी खेळलेल्या प्रेक्षणीय कुस्त्यांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

छत्रपती संभाजीनगर : नगरपरिषद नगरपंचायतीसाठी 2 दिवसात फक्त 5 नामनिर्देशन पत्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात नगरपरिषद निवडणुकीसाठी केवळ ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कन्नड, पैठण या दोन नगर परिषदेसाठी 2 अर्ज दाखल झालेत तर वैजापूर नगर परिषदेसाठी 3 अर्ज असे एकूण 5 अर्ज दाखल झाले आहेत. हे पाचही अर्ज नगरसेवक पदासाठी आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी अजून पर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे युती आघाडीचे समीकरण बघूनच इच्छुक समोर येतील अशी शक्यता वर्तवल्या जात आहे.

विदर्भात कडाक्याची थंडीसह गोंदिया सर्वाधिक कमी तापमान

- विदर्भात कडाक्याची थंडीसह गोंदिया सर्वाधिक कमी तापमान मागील तीन ते चार दिवसात नोंदवले गेले आहे..

- विदर्भात गेल्या आठ दिवसांपासून थंडीची तीव्र लाट आलीय. नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा सरासरी पेक्षा 2 ते 3 अंशाने कमी आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार पुढील पाच ते सहा दिवस विदर्भात थंडीचा जोर कायम राहणार आहे. गोंदिया सलग तिसऱ्या दिवशी विदर्भातील सर्वात थंड जिल्हा ठरलाय.

- उत्तरभारतातून येणारे थंड वारे विदर्भात गारठा वाढवत आहेत. नागपूरच्या तापमानात कालच्या तुलनेत २.५ अंशांनी घट झाली आहे. सध्या उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भात तापमान घसरत आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहील. 21 तारखेनंतर पुन्हा तापमान सरासरीपेक्षा कमी आहे ते पूर्ववत होईल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुण्यात घरफोड्या करणारी टोळी गजाआड,आठ गुन्हे उघडकीस

दिवाळीच्या सुटीत बंद सदनिकांमध्ये घरफोडी करून ऐवज लुटणाऱ्या टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी आरोपी शिवम दत्ता अवचर (वय १९, रा. नऱ्हे, पुणे), नवनाथ ऊर्फ लखन बाळू मोहिते (वय २२, वैदुवाडी, हडपसर) या दोघांना अटक केली. तर, पर्वतीमधून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

हे आरोपी सराईत गुन्हेगार असून, पोलिसांना चकवण्यासाठी ठिकाणे बदलत होते.तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे विमानतळ पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.

विमाननगर परिसरातील एका फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडे कापून चोरट्यांनी १० लाख ५१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरी केली होती.परिसरातील २५० सीसीटीव्ही

तपासले. या तपासातून आरोपींचा शोध लागला.

लाल किल्ल्याजवळील कार स्फोटाचा तपास एनआयएकडे

- लाल किल्ल्याजवळील कार स्फोटाचा तपास एनआयएकडे, तपासाचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्याचे नागपूर कनेक्शन...

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन तपास ‘एनआयए’कडे सोपवला

- तपास पथकात १० वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व मराठमोळे आयपीएस विजय साखरे करत आहेत

- साखरे हे नागपूरचे मूळ रहिवासी, व्हीएनआयटी आणि आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहे..

- सध्या ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अतिरिक्त महासंचालक (ADG) म्हणून कार्यरत

- देशभरातील तपास यंत्रणांचे लक्ष आता दिल्ली कार स्फोट प्रकरणावर

चऱ्होली मध्ये गोळीबार, गोळीबारात एकाचा दुर्देवी मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरामध्ये दोन आरोपींनी केलेल्या गोळीबारात एका सदतीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी सहा वाजता दरम्यान नितीन गिलबिले ह्या तरुणावर दोन आरोपींनी गोळबार करून त्याचा खून केला आहे अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर या दोन आरोपींनी मिळून नितीन गिलविले चा खून केला असावा असा पोलिसांचा संशय आहे गोळीबाराची माहिती मिळताच देण्यात दिघी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नितीन गिलबिलेवर गोळीबार करून त्याचा खून करणारा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

प्रदीप गारटकरांचा इंदापुरातून गर्भित इशारा

इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून इंदापुरात मोठा पेज प्रसंग निर्माण झालाय. इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शवलाय.

जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र इंदापूर मध्ये प्रदीप गारटकर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत..आज पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी इंदापूर शहरातील गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

Ambegoan-बिबट्याच्या दहशतीतही भक्ती अबाधित

पुणे नाशिक महामार्गावरुन हातात भगवी पताका, डोक्यावर तुळशीचं वृंदावन, आणि ओठांवर हरिनामाचा गजर अशा भक्तीरसात न्हालेलं वातावरण माऊलींच्या दर्शनाची आस उराशी घेऊन वारकरी दिंड्या मजल दरमजल करत आळंदीच्या दिशेने पुढे सरकत आहेत.सध्या या दिंडींचा प्रवास बिबट प्रवण क्षेत्रातून सुरू असून, बिबट्यांच्या दहशतीचं सावट असतानाही वारकऱ्यांची श्रद्धा आणि धैर्य अविचल आहे.माऊलींच्या नामस्मरणात रममाण झालेले हे वारकरी भीतीला न जुमानता भक्तीच्या ओढीनं आळंदीकडे वाटचाल करत आहेत.माऊलींच्या दर्शनासाठीची ही ओढ — म्हणजेच भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा जिवंत उत्सव असल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

3 Idiots मधील 'मिलिमीटर' आठवतोय का? तुर्की पत्नीसोबत दिल्लीत दिसला, VIDEO होतोय व्हायरल

Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

Leopard Attack : धक्कदायक! अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, जबड्यात पकडलं अन्...

SCROLL FOR NEXT