Maharashtra Live News Update : Saam Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पावसाळी अधिवेशन अपडेट, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि केतनला न्याय मिळावा, या मागणीसाठी आज गहूंजे येथील लोढा बेलमोंडो परिसरातील रहिवाशांनी कँडल मार्च काढला. या मार्चमध्ये केतनचे वडील विशाल अग्रवाल, आई राखी अग्रवाल, बहीण, आजोबा तसेच नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कँडल मार्चदरम्यान आपल्या मुलाच्या आठवणीने केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, केतनच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी आणि प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करून आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे..

उद्धव ठाकरे यांचे परभणीत आगमन

परभणीत जिल्हाप्रमुख विवेक नावंदर यांच्या घरी उद्धव ठाकरे यांचे स्वागत

परभणीत उद्धव ठाकरे यांचे यांचे फटाक्याच्या व बँड ढोल ताशेचा s

स्वागत

अहिल्यानगर - संभाजीनगर महामार्गांवर अपघात....

अपघातात वऱ्हाडी घेऊन जाणारी लक्झरी बस जेऊर परिसरात झाली पलटी..

लक्झरी बस पलटी झाल्याने काही जण झाले किरकोळ जखमी....

लक्झरी बस मध्ये एकूण 25 ते 30 प्रवासी होते सहभागी...

खरवंडी वरून लग्न समारंभ उरकून लक्झरी बस चालली होती पुण्याच्या दिशेने....

जेऊर परिसरातील डिव्हायडरवर अचानकपणे लक्झरी बस आढळून झाली पलटी

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा निषेध; पिंपरी-चिंचवडमध्ये कँडल मार्च

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमधील लोढा सोसायटीच्या रहिवाशांनी कँडल मार्च काढला. केतनच्या आत्म्यास शांती लाभावी आणि त्याला न्याय मिळावा, यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी 'केतनला न्याय द्या' अशा घोषणांसह फलक झळकविण्यात आले. तसेच, या कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा देत फाशीची शिक्षा सुनावावी, अशी मागणी नागरिकांनी शासन आणि न्यायव्यवस्थेकडे केली.

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कोकणकन्या एक्सप्रेस ९ तासांचा विलंब

कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्याचा फटका मुंबई कडून मडगावला जाणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसला बसला. कुडाळ रेल्वेस्थानकावर सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी दाखल होणारी ही गाडी तब्बल ९ तास उशिराने संध्याकाळी ५.३५ वाजता कुडाळ स्थानकात पोहोचली.मांडवी एक्सप्रेसच्या थर्ड इकॉनॉमी एसी डब्यांतील एसी यंत्रणा खेड स्थानकापासूनच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षक क्रांती संघटना आक्रमक; परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी

भिवंडी येथे टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याच्या घटनेनंतर शिक्षक क्रांती संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी ही परीक्षा तातडीने विश्वासार्ह संस्थेमार्फत पुन्हा घेण्याची मागणी केली. पेपरफुटीमुळे हजारो परीक्षार्थी शिक्षकांचा भ्रमनिरास झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, परीक्षा रद्द झाल्याने सर्व उमेदवारांचे प्रवेश शुल्क शासनाने परत करावे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेऐवजी सक्षम व पारदर्शक संस्थेकडे परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंच्या स्वागताला हिंगोलीत शिवसैनिकांची तुफान गर्दी

उद्धव ठाकरेंच्या स्वागताला हिंगोलीत शिवसैनिकांची तुफान गर्दी

पोलिसांनी गर्दी बाजूला सारत उद्धव ठाकरेंना सभेच्या स्थळी पोहचवले

बंडखोर खासदारांच्या विरोधात गद्दार म्हणून शिवसैनिकांच्या घोषणा

मावळतमध्ये दमदार पावसाला सुरुवात, चाकरमान्यांची तारांबर उडाली

चार दिवसाची विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा मावळ तालुक्यात दमदार पुनरागमन केले. वडगाव मावळ परिसरात दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. अचानक कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहनचालकांची चांगलीच धांदल उडाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला असून, पिकांना जीवदान मिळण्याची आशा पुन्हा बळावली आहे.

टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे - जयंत आंसगावकर

टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे

कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आंसगावकर यांची मागणी

टीईटी पेपर फुटीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान

सरकार मात्र आमदार आणि खासदार खोडाफोडीचे राजकारण करण्यामध्ये मग्न

महाराष्ट्रातून सुमारे सात लाख परीक्षार्थी देणार होते परीक्षा

कल्याण मधील नामांकित वकील चालवत होती सेक्स रॅकेट 

कल्याण मधील नामांकित वकील चालवत होती सेक्स रॅकेट

एडवेकेट मनीषा नांदे आशे महिला वकिलाचे नाव

ठाणे ह्यूमन ट्राफिक सेलने दोन पीडित तरुणीची सुटका करीत वकील नांदे हिला केली अटक

कल्याण आणि पनवेल कोर्टात ही करत होती प्रॅक्स्टिस

तीन महिन्यापासून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती

चंद्रपुरात ६ लाखांचे 'MD' ड्रग्ज जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ड्रग्ज तस्करांविरोधात एक कारवाई करत तब्बल ६ लाखांचे 'एमडी' ड्रग्ज जप्त केले. चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरातील 'इटनकर पान मंदिर'जवळ ड्रग्जची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचला आणि ओम संतोष इटनकर नावाच्या २५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.

बंडखोर खासदारां विरोधात ठाकरेची युवासेना आक्रमक

ठाकरे सेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्या नंतर ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.ठाकरेच्या युवा सेनेने गाढवावर बंडखोर खासदारांचे फोटो लावून आंदोलन केले .नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात हे आंदोलन हे करण्यात आलं.यावेळी बंडखोर खासदारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.भाजपला स्वतःच बाळ होतं नाही, दुसऱ्याचं बाळ स्वतःच्या कंबरेवर घेऊन नाचवण्याचं काम करत असल्याचा आरोप युवा शिवसैनिकांनी केला.

तुळजाभवानी मंदीरातील पेड दर्शन बंद करण्याची मागणी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पेड दर्शन बंद करावे पेड दर्शनामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी मोठा ञास होत आहे.त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी पुजारी मंडळाच्या अनेक मंदीर संस्थानच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

फुटीरांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे 

वाशिममधून उद्धव ठाकरे

हरामखोर गेले पण शिवसैनिक हलला नाही

२ ते ४ वर्षापासून गद्दारीची किड लागली

लुटारू राम मंदिर लुटायला निघाले

- उद्धव ठाकरे 

जनता आमच्या पाठीशी; खा.संजय देशमुख

यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली,त्या सभेत वणी विधानसभा मतदारसंघातील लोक होती.विशेष म्हमजे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तिथे आली होती.आम्हाला जर विरोध असतात तर त्या सभेत प्रचंड गर्दी झाली असती.त्यांना बोलण्याचा अधिकार मात्र जणता आमच्या मागे आहे.सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला.विकासासाठी आम्ही गेलो.

Dhule: धुळे जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

धुळे जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

धुळे जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे

जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी देखील पावसाचा खंड पडलेला दिसून येत असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या आभाळाकडे पुन्हा नजरा लागून राहिल्या आहेत

आधीच जून महिन्याचे तीन आठवडे कोरडे गेलेले असताना, दोन दिवसांच्या जेमतेम पावसानंतर गेल्या चार दिवसांपासून पावसाचा पुन्हा एकदा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढली आहेत

रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार, पाणीपुरवठा योजनेला देणार मंजुरी

रायगडावर पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गडावरील पाणीपुरवठा योजनेला नक्की मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

यासोबतच यंदा पावसाने काहीशी ओढ दिली असली तरीही अवघड परिस्थिती आल्यास महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असेही त्यांनी सांगितले. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी शिंदे आज रायगडावर उपस्थित होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. यासोबतच लाडकी बहिण योजनेचे पैसे कधीही बंद होणार नाहीत याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

परभणी पोलिसांची मोठी कारवाई

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील धामोनी येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनपेठ पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई करत हत्या करण्याचा कट उधळून लावला आहे. ग्रामपंचायतीच्या जुन्या वादातून बदला घेण्यासाठी उत्तर प्रदेशातून गावठी पिस्तूल आणल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा ८२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शेगाव मंदिर परिसरातील उघड्यावर विक्री करणाऱ्या पेढे विक्रेत्यांवर FDA ची कारवाई!..

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात मंदिर परिसरातील उघड्यावर विक्री केल्या जाणाऱ्या पेढे विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली आहे. शेगावात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात , तेव्हा मंदिर परिसरात प्रसादाच्या नावाखाली विक्रेते पेढे विक्री करतात.. तेव्हा हे पेढे भेसलयुक्त असल्या ची तक्रार प्राप्त झाल्याने FDA ने कारवाई केली असून दुकानांमधून गोड पदार्थांचे नमुने घेण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाईचे आदेश दिले आहे. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली आहे.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करावे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश, भारताची संस्कृती आणि मूल्ये आपल्या देशात पोहोचवावीत, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली. पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या शिवभक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने विशाळगड परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

Maharashtra News Live Update: पुण्यात पावसाला सुरूवात

पुणे शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर, हडपसरसह शहरातील अनेक भागात पाऊस पडत आहे. तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अवैध दारू विक्री विरोधात लातूरमधील ग्रामस्थ संतापले

लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर शिवारात मागच्या काही दिवसापासून अवैद्य दारू विक्री वाढली होती, या दारू विक्री विरोधात वारंवार तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने, संतप्त ग्रामस्थ अवैध दारू विक्री विरोधात आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं., महिला आणि ग्रामस्थांनी मिळून अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप करत चक्क धाबा जाळला आहे

राज्यातील शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ठाकरे गटाची मागणी

टीईटी पेपर फुटीवर ठाकरे शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांनी नैतिकतेची जबाबदारी सांभाळत राजीनामा देण्याची मागणी केली

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणानंतर टीईटी पेपर फुटीवर राज्यसरकार व केंद्रसरकारवर साधला निशाणा

केंद्र व राज्य सरकारची कुठलीही परीक्षा घेण्याची लायकी नसल्याचा पाटील यांचा घणाघात

विद्यार्थ्यांच नुकसान करण्याच काम राज्य सरकार व केंद्र सरकारतर्फे सुरू...

स्मार्ट मीटरवरून मनसे आक्रमक

स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत मनसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला तब्बल दोन तास थांबवून ठेवले. अखेर अधिकाऱ्याने निवेदन स्वीकारत वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा तणाव निवळला.स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ऑपरेशन टायगरच्या यशानंतर श्रीकांत शिंदे शनी चरणी होणार नतमस्तक...

खासदार श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर हे शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी थोड्याचं वेळात येणार....

खा.श्रीकांत शिंदे यांच्यासोबत ओमराजे निंबाळकर, श्रीरंग बारणे देखील येणार असल्याची माहिती...

ऑपरेशन टायगरच्या यशानंतर श्रीकांत शिंदे शनी चरणी होणार नतमस्तक...

बीड: आमचे, काँग्रेसचे, समाजवादी पार्टीचे खासदार फुटणार नाहीत.

खासदार फोडण्यासाठी त्यांना टार्गेट केले जाणार आहे... परंतु आमचे, काँग्रेसचे व समाजवादी पक्षाचे खासदार तुटणार नाहीत... डेलीमिटेशन साठी त्यांना आणखी 41 खासदारांची गरज आहे परंतु असे काही होणार नाही.. खासदार बजरंग सोनवणे यांनी मुलावर होत असलेल्या आरोपामुळे भेट घेतली असेल... राज्याचे गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे तर केंद्रातले अमित शहा यांच्याकडे आहे त्यामुळे ते भेटले असतील असे देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी आमदार रोहित पवार हे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

रत्नागिरीत स्मार्ट मीटरवरून मनसे आक्रमक

स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत मनसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला तब्बल दोन तास थांबवून ठेवले. अखेर अधिकाऱ्याने निवेदन स्वीकारत वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा तणाव निवळला.स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उल्हासनगरात शिंदेंच्या शिवसेनेला दुसरा मोठा धक्का

शिवसेना नगरसेविका पूजा भोईर अपात्र घोषित

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय

अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध नगरसेवक पद रद्द

याआधी विक्की सिंग लबाना आता पूजा भोईर

उल्हासनगरच्या राजकारणात खळबळ

कोल्हापूरात विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली. पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या शिवभक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने विशाळगड परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणेंची SIT कडून चौकशी सुरू

- पवनसुत निवासस्थानावरून सौरव सोनवणे चौकशीसाठी पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय केज येथे दाखल.

- चौकशीसाठी त्यांना बोलावल्यानंतर ते SIT समोर हजर.

- IPS वेंकटराम यांच्या समोर होणार चौकशी सुरू.

- चौकशीसाठी स्वतः हजर राहून जिथे बोलावतील तिथे जाऊन सहकार्य करणार असे यापूर्वी सौरव सोनवणे यांनी सांगितले होते.

बारामती : इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची 103 वी वार्षिक सभा वादळी ठरली.

12.05 टक्के लाभांश मंजूर झाला असला तरी अहवालातील चुकांवरून सभेत मोठा गोंधळ झाला. विविध विषयावरून संचालकांमध्ये जुंपली.

दिव्यांग माजी सभापतींनी 14 संचालकांवर आरोप करताच काही संचालक त्यांच्या अंगावर धावले. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही.

नाशिकमध्ये महापौर हिमगौरी आडके शहरातील अतिक्रमणांबाबत आक्रमक

* अधिकाऱ्यांना घेऊन महापौर थेट रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणाच्या ठिकाणी

* अधिकाऱ्यांना आदेश देऊन जागीच तोडले अतिक्रमण

* नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा

* स्वतः महापौर रस्त्यावर उतरल्याने अतिक्रमित बांधकाम धारकांची धावपळ

पुणे जिल्हा परिषद शाळांमधून अंतराळ स्वप्नांना भरारी; नासा-इस्रो पूर्वपरीक्षेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ही परीक्षा होत नव्हती, तर देशाच्या भविष्यातील अंतराळ वैज्ञानिक घडवण्याची पायाभरणी होत आहे हातात पेन, मनात जिद्द आणि डोळ्यांत अवकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न घेऊन ग्रामीण भागातील चिमुकले विद्यार्थी मोठ्या भरारीची तयारी करत आहे

केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मित्तल दाम्पत्याची चौकशी

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रेनू मित्तल आणि नरेंद्र मित्तल यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. दोघांनीही सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून आपले जबाब नोंदवले आहेत.

मित्तल कुटुंबाचा विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबाशी संबंध असून, सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्या विवाहाची जुळवाजुळव करण्यात या कुटुंबाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. तसेच, काल दिलेल्या मुलाखतीत प्रवीण गोयल यांनीही मित्तल कुटुंबाचा उल्लेख केला होता

आगामी काळात देशात महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊन लागू होऊ शकते - रक्षा खडसे

आगामी काळात देशात महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊन लागू होऊ शकते, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे...

पूर्वी संसदेत आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे हे विधेयक पूर्ण होऊ शकले नव्हते. मात्र,यावेळी इतर राजकीय पक्षांचे खासदारही या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार आहेत...

या विधेयकामुळे देशातील महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये 33 % आरक्षण मिळणार आहे...

देवगड येथील न्हावानकोंड धबधबा झाला प्रवाहित

तळकोकणात वर्षापर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी.. पावसाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक धबधबे प्रवाहीत होतात आणि पर्यटकांना आकर्षित करतात.

देवगड तालुक्यातील न्हावानकोंड धबधबा आता प्रवाहित झाला आहे.

जिल्ह्यातील हा पहिलाच धबधबा आहे जो प्रवाहित झालाय.

पर्यटकही या धबधब्यावर गर्दी करू लागले आहेत.

आदमपूर ते आदमपूर फाटा या रस्त्यावर पडले मोठ-मोठे खड्डे

नांदेडच्या बिलोली तालुक्यातील आदमपूर ते आदमपूर फाटा या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.

रस्त्यावर मध्यभागी पडलेल्या या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

अनेक वेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी आदमपूर येथील गावकऱ्यांनी केली आहे.

अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; फ्लॅटवर छापा टाकून प्रतिबंधित लाखो रुपयांच्या ई-सिगारेट जप्त

अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; फ्लॅटवर छापा टाकून प्रतिबंधित लाखो रुपयांच्या ई-सिगारेट जप्त...

२ लाख ७५ हजारांच्या प्रतिबंधित सिगारेटसह आशिष कडू पोलिसांच्या ताब्यात; राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल

विलास घुले हत्या प्रकरणात एसआयटी कडून होणार खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी

- केज पोलीस स्टेशन मध्ये आज दुपारी सौरव सोनवणे स्वतः हजर राहून चौकशीला सामोरे जाणार.

- विलास घुले हत्या प्रकरणात फिर्यादीने पुरवणी जबाबात नाव दिलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांना चौकशीसाठी एसआयटी ने पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आल्याची माहिती.

उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात, हिंगोलीत सभेची तयारी पूर्ण

शिवसेनेतील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत

आज हिंगोलीत उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधतील दरम्यान हिंगोली शहरातील महावीर भवन परिसरात शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली असून सायंकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे याचे हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये आगमन होईल

Washim : सहा खासदार फुटीनंतर शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज वाशिमच्या दौऱ्यावर

सहा खासदार फुटी नंतर शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज वाशिमच्या दौऱ्यावर आहेत...

वाशिम जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.

त्यामुळे या ठिकाणी ते कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार

वर्धा–शिर्डी आणि वर्धा–शेगाव बससेवेचा शुभारंभ

- वर्धा–शिर्डी आणि वर्धा–शेगाव बससेवेचा शुभारंभ

- साईबाबा व श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी

- पालकमंत्री पंकज भोयर यांच्या पुढाकारातून बससेवा सुरू

- वर्धाहून दररोज सकाळी ६.३० वाजता शिर्डीसाठी बस रवाना होणार

टीईटी परीक्षेसाठी प्रशासन सज्ज; फिंगरप्रिंट आणि फेस स्कॅनिंगची कडक व्यवस्था

टीईटी परीक्षेसाठी प्रशासन सज्ज; फिंगरप्रिंट आणि फेस स्कॅनिंगची कडक व्यवस्था

बोगस उमेदवारांना आळा घालण्यासाठी २२ केंद्रांवर कडक बंदोबस्त; १३ हजारांवर परीक्षार्थी परीक्षा देणार

Political News : मंत्री संजय राठोडांना ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून प्रत्युत्तर

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळच्या दौऱ्यावर मंत्री संजय राठोड यांनी टिका केली असून जो गरजते है,वो बरसते नही असं म्हणतं मंत्री राठोड यांनी टिका केली,या टिकेला ठाकरेसेनेचे जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं

नागपुरात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळा 

- ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम

- शिवराज्याभिषेक सोहळा समिती, नागपूर यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

- शिवाजी महाराज चौक, महाल, नागपूर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

Thane : भिवंडीत मुदतबाह्य पिठाचा नऊ टन साठा जप्त,अन्न सुरक्षा पथकाची कारवाई

भिवंडी शहरातील निजामपूर परिसरात अन्न निरीक्षण पथकाने केलेल्या कारवाईत 5 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुदतबाह्य पिठाचा नऊ टन वजनाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध पथकातील सहाय्यक आयुक्त संतोष सरोसिया व अन्न सुरक्षा अधिकारी यांना भिवंडीत एका ट्रक मधून मुदतबाह्य पिठाचा साठा गुजरात भुज येथील व्यापारी विनोद भानुशाली यांना विक्री साठी पाठवला जाणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Wangchuk: 'अन्यायापासून ते मुक्तीपर्यंत...' सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून पहिला मेसेज, २० जुलैसाठी देशवासियांना आवाहन

Maharashtra News Live Update: हायकोर्टाचा दणका अन् पोलिसांचा अॅक्शन मोडवर, शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Jennifer Winget चा पती William Ishmael आहे तरी कोण? घटस्फोटानंतर १२ वर्षांनी अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार

SCROLL FOR NEXT