Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल, राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ अन् विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

विधान परिषद निवडणूक -  काँग्रेस, भाजपचे उमेदवार आज नामांकन दाखल करणार

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज भाजप आणि काँग्रेस उमेदवार नामांकन सादर करणार आहेत. भाजपकडून अरुण लाखानी, तर काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल हे उमेदवार आहेत. चंद्रपूर गडचिरोली वर्धा या तीन जिल्ह्यांचा मिळून हा मतदार संघ असून एकूण 977 मतदार यात आहेत. आज दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार नामांकन दाखल करीत असल्याने पक्षातील मोठ्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार कीर्ती भांगडिया यांची उपस्थिती असेल.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 20 वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यातील नेते आमदार खासदारांचे आभार मानले. दरम्यान गुलाबराव पाटील हे प्रताप पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते हे योग्यच होतं मात्र मला उमेदवारी देणे हा पक्षाचा निर्णय असल्याचे मतही नंदकिशोर महाजन यांनी बोलताना व्यक्त केले आहे..

महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

नांदेड विधान परिषदेची जागा भाजपाला सुटली. भाजपाने खासदार अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक अमर राजूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुती कडून आज सोमवारी अमर राजूरकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. खासदार अशोक चव्हाण आणि भाजपा नेत्याच्या उपस्थितीत अमर राजूरकर उमेदवारी दाखल करणार आहेत .

दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार गुणपत्रक

दहावीच्या परीक्षेची एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आज दुपारी तीन वाजल्यानंतर शाळांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार

माध्यमिक शाळांना विभागीय मंडळामार्फत सकाळी अकरा वाजता प्रमाणपत्र दिली जाणार आहेत

साताऱ्यात जोरदार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या खटाव तालुक्यातील डिस्कळ सह ललगुण, बुध परिसरात नागरिकांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. आज दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. या दमदार पावसामुळे अक्षरशः रस्त्यावर पाण्याचे लोट पाहायला मिळाले.. तासभर पडलेल्या पावसामुळे भूजल पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असणार आहे.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये महायुतीत उमेदवारीवरून तणाव

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे आत्तापर्यंत केवळ एकच अर्ज दाखल झाला असला तरी राजकीय पक्षांचे उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन आज होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राजकीय जत्रेचे चित्र पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

SCROLL FOR NEXT