Aaditya Thackeray at a public event amid growing buzz over his possible elevation in Thackeray Sena. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

Leadership Shift in Thackeray Sena: ठाकरे सेनेच्या कार्यकारणीत बदलाचे वारे वाहू लागलेत. ठाकरेसेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे जाणार असल्याची चर्चा रंगलीय. मात्र या चर्चेमागे नेमकी रणनीती काय आहे? आदित्य ठाकरेंनी या चर्चेवर काय स्पष्टीकरण दिलंयं. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Jadhav, Suprim Maskar

दसरा मेळाव्यातील आदित्य ठाकरेंच्या याचं भाषणानं शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाची ठाकरेसेनेत चांगलीच चर्चा सुरू होती. अशातच आता 2003 मधील शिवसेनेच्या महाबळेश्वरच्या अधिवेशनाची पुनरावृत्ती होण्याची चर्चा ठाकरेसेनेत रंगलीय. यावेळी आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर पक्षाच्या 'कार्याध्यक्षपदाची' धुरा सोपवली जाणार जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

जून महिन्यात ठाकरेसेनेनं महत्त्वाची कार्यकारिणी बैठक बोलावलीय. याचं बैठकीत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. तसचं हा प्रस्ताव एकमताने मंजूर करून घेण्याचीही रणनीतीही आखली आहे.ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची 2003 साली महाबळेश्वरच्या अधिवेशनात निवड झाली होती. त्याचं पद्धतीनं 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी आदित्य ठाकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते. उद्धव ठाकरेंप्रमाणेच आदित्य ठाकरेही आपली नवी टीम तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान कार्याध्यक्ष पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नाव आल्यानंतर संजय राऊतांनी राजकारण तरुणांच्या हातात जायला पाहिजे,असं सकारात्मक विधान केलयं तर भाजपनं मात्र ठाकरेसेनेत अंतर्गत गटबाजी असल्याचा दावा केलाय. दिवसभर ही चर्चां सुरू असताना अखेर स्वतः आदित्य ठाकरे याबाबत स्पष्टीकरण दिलं.

आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही, याची नोंद घ्या. आदित्य ठाकरेंनी जरी या कार्याध्यक्ष पदाच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या, तरी आदित्य ठाकरेंची खासदारांवरील नाराजी, राज्यसभा खासदारकी ठाकरेसेनेला मिळावी यासाठी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता. 2029 च्या निवडणुकीआधी ठाकरेसेनेत संघटनात्मक बदल अटळ आहेत. त्यामुळेच मातोश्रीचं पुढचं नेतृत्व पुढच्या पिढीकडे जाणार यात तिळमात्र शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Crisis: मुंबईत पाणीबाणी! BMC कडून नियमावली जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई

Maharashtra News Live Update: कृष्णा नदीचे पाणी दूषित; पिण्यासाठी वापरू नये, प्रशासनाच्या सूचना

Broiler Chickens Death : ३६०० कोंबड्यांचा गूढ मृत्यू; पोल्ट्री व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान, एका रात्रीत नेमकं काय घडलं?

पोलीस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Kalyan Crime: घंटागाडीत सापडला महिलेचा मृतदेह, कल्याण- डोंबिवलीमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT