दुर्दैवी : 31 डिसेंबरची रात्र तरुणाच्या जीवावर बेतली; पार्टी करायला गेला, तो घरी परतलाच नाही अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

दुर्दैवी : 31 डिसेंबरची रात्र तरुणाच्या जीवावर बेतली; पार्टी करायला गेला, तो घरी परतलाच नाही

31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या (New Year Party) आगमनाची पार्टी साजरी करणे एका 28 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतलं आहे.

अभिजित घोरमारे

गोंदिया : 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या (New Year Party) आगमनाची पार्टी साजरी करणे एका 28 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतलं आहे. पार्टी दरम्यान दंगा मस्ती करण्यासाठी नदी पात्रामध्ये उतरलेल्या युवकाच्या बुडून मृत्यु झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गाढवी नदी पात्रात घडली आहे. राहुल पंढरी काळसर्पे वय 28 वर्षे राहणार महागाव असे मृतक युवकाचे नाव आहे.

महागाव येथील राहुल काळसर्पे हा आपल्या मोठ्या भाऊससह काही मित्रांसोबत केशोरी येथुन जवळच असलेल्या खोळदा येथे नववर्षाच्या पुर्वसंध्येला पार्टी (Party) करण्यासाठी गेले होते. जेवन बनवुन राहुल मित्रासोबत मौज मस्ती करण्यासाठी गाढवी नदीच्या पात्रात उतरुन खोल असलेल्या डोहात गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल बुडु लागला. तो पाण्यात दिसेनासा झाल्याने त्याच्या मोठ्या भावाने गावातील लोकांच्या मदतीने शोधकार्य सूरु केले असता रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला.

हे देखील पहा -

सदर घटनेची माहिती मिळताच अर्जुनी-मोरगाव आणि केशोरी पोलीस घटनास्थळी दाखल होत,मृताचे शव शवविच्छेदनाकरिता हलविले असुन सदर घटनेची नोंद केशोरी पोलीस स्टेशन (Keshori Police Station) येथे दाखल करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्व संध्येला एका युवकाच्या करुण मृत्यु झाल्याने महागावात शोककळा पसरली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT