Chhatrapati Sambhajinagar News  Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; १८ वर्षीय तरुणाने हॉस्टेलमध्येच संपवलं जीवन

Sambhajinagar Crime News: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने अकॅडमीच्या हॉस्टेलमध्येच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने अकॅडमीच्या हॉस्टेलमध्येच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. श्रीकांत दशरथ वाघ असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत श्रीकांत हा छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील निपाणी आडगाव गावातील रहिवासी होता. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी वाळूज एमआयडीसी मधील गरुडझेप करियर अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये ११ महिन्यापासून राहत होता.

गुरुवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्याने हॉस्टेलच्या बाथरूममध्ये जाऊन लोखंडी अँगलला कमरेचा बेल्ट बांधून स्वतःला गळफास लाऊन घेतला. श्रीकांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT