Accident News Saamtv
महाराष्ट्र

Accident News: वाढदिवस ठरला मृत्यूचा दिवस! केक आणायला गेला अन् जीव गमावून बसला; मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ

वाढदिवसादिवशीच तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aurangabad News: वाढदिवसाचा केक घेवून घरी जात असतानाच अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना फुलंबी राजुर रोडवर घडली आहे. तरुणाचा वाढदिवसच मृत्यूचा दिवस ठरलेल्या या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Aurangabad News)

मिळालेल्या माहितीनुसार, जातेगांव येथील विकास शेजवळ याचा वाढदिवस असल्याने तो आणि त्याचे भाऊजी सुरेश भालेराव हे हे दुचाकी वरुन फुलंब्रीला आले होते. वाढदिवसाचा केक घरी घेऊन जात असताना फुलंब्री राजुर रोडवरील ज्ञानसागर विद्यालयासमोर त्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या हायवाने जोराची धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाऊजी आणि मेव्हुण्याला त्वरीत फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून विकास शेजवळ यास मयत घोषित केले.

तर त्याच्यासोबत असलेले त्याचे भाऊजी सुरेश भालेराव यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. वाढदिवसाचा केक घरी घेऊन जात असतांनाच हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर पाणी कपातीवर दोन दिवसांत निर्णय

LPG price Hike : महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, तुमच्या शहरातील ताजे दर काय?

Moong dal Sheera Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिंटात बनवा टेस्टी खमंग मूग शिरा, नोट करा रेसिपी

राजकारणात मोठी उलथापालथ; माजी मंत्र्यांसहित ३०० हून अधिक नेत्यांचा सत्ताधारी पक्षात प्रवेश

Sunday Horoscope : अनुभवी लोकांचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT