Accident News Saam tv
महाराष्ट्र

Mumbai- Goa Highway Accident: हदयद्रावक! ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात, महिलेचा दुर्देवी मृत्यू; 2 जखमी

Accident News: समोरुन येणाऱ्या ट्रकने रिक्षेला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे..

Gangappa Pujari

सचिन कदम, प्रतिनिधी...

Mumbai - Goa Highway Accident: आजचा दिवस (२७, एप्रिल) राज्यभरात घडलेल्या भीषण अपघातांच्या बातम्या समोर आल्या आहेत. सकाळीच मुंबई पुणे एक्सप्रे वर ११ गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर मुंबई गोवा महामार्गावर एक अपघात झाला असून ज्यामध्ये एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) माणगावमध्ये रिक्षा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ही रिक्षा माणगाव एसटी स्टॅंन्डमधून रेल्वे स्टेशनला प्रवासी घेवून जात होती. यावेळी समोरुन येणाऱ्या ट्रकने रिक्षेला धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अशाच भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.  मुंबई-पुणे (Mumbai- Pune) एक्सप्रेस वेवर ११ वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विचित्र अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून चार जण किरकोळ जखमी झाली आहेत. मात्र यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT