नर्सची आत्महत्या ! सोलापूर महामार्गावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह Saam Tv
महाराष्ट्र

नर्सची आत्महत्या ! सोलापूर महामार्गालगत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

सोलापूर महामार्गावरील (Solapur Highway) मांजरसुंबा घाटातील महामार्गालगतच, एका 26 वर्षीय नर्सचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

विनोद जिरे

बीड- सोलापूर महामार्गावरील (Solapur Highway) मांजरसुंबा घाटातील महामार्गालगतच, एका 26 वर्षीय नर्सचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना काही वेळापूर्वी उघडकीस आली आहे.सोनाली अंकुश जाधव वय 26 रा.शिवाजी नगर,बीड असे त्या तरुणीचे नाव आहे.

मयत सोनाली जाधव (Sonali Jadhav) ही बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये, शिकाऊ नर्स म्हणून काम करत होती. तिचा मृतदेह काही वेळापूर्वी, मांजरसुंबा घाटात 24 तास वाहणाऱ्या महामार्गलगत असणाऱ्या झाडाला, गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

तर घटनास्थळी एम.एच.20 ई.बी.2504 या क्रमांकाची स्कुटी आढळून आली आहे. तर घटनेची माहिती समजताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. दरम्यान या तरुणीने आत्महत्या केली की हत्या ? याचा नेकनूर पोलीस तपास करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Home Attack: प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार; मोठा खुलासा करत म्हणाला, 'सलमान खानसोबत मैत्री...'

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

नामांकित कंपनीच्या संचालकाने आयुष्य संपवलं, औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! ₹2 लाख जमा करा, फक्त इतक्या वर्षात मिळेल ₹89,990 व्याज; सरकारची गॅरंटी

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा २० वर्षानंतर निकाल लागला, पद्मसिंह पाटील निर्दोष, ओमराजेंना धक्का; कोर्टात नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT