nagpur news
nagpur news  saam tv
महाराष्ट्र

Nagpur : झेडपी सभागृहात सभा गुंडाळल्याने पेटले रण; विरोधकांकडून टेबल, खुर्च्यांची तोडफोड, माइक-कागदपत्रे भिरकावले

संजय डाफ

Nagpur News : नागपूर जिल्हा परिषदेत आज अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला आहे. विषयपत्रिकेवरील विषय चर्चा न करताच अध्यक्षांनी मंजूर केल्यानं संतप्त विरोधकांनी सभागृहातील साहित्याची फेकफोक करीत तोडफोड केली. सत्तापक्षातील बंडखोरांनीही विरोधकांना साथ दिली. यामुळे शेवटच्या टप्प्यात वातावरण चांगलेच तापले होते. (Latest Marathi News)

६ महिन्यानंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व १ ते १० विषय मंजूर केल्याचे जाहीर केले. त्याच वेळेस विरोधी पक्ष नेते आतिश उमरे, संजय झाडे व इतरांनी विषयांवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्षा कोकड्डे यांनी सभा गुंडळली. त्यामुळे संतप्त विरोधकांनी सभागृहातील टेबल, खुर्च्यांची फेकाफेक करीत तोडफोड केली, माइक फेकले, कागपत्रही भिरकावले.

कॉंग्रेसचे (Congress) बंडखोर सदस्य नाना कंभाले यांनीही विरोधकांना साथ दिली. यावेळी विरोधकांनी विषय पत्रिकेवरील विषयांना विरोध करत त्याची नोंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. या प्रकारामुळे जिल्हा परिषद सभागृहात वातावरण तापलेले पाहायला मिळाले. टेबल, खुर्च्यांची फेकाफेक विरोधकांनी केली. त्यानंतर कागदपत्रे भिरकावल्यानंतर विरोधकांनी सभागृहातून बाहेर पडले. या गोंधळाची जिल्ह्यातील राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: पिकलेली की कच्ची कोणती केळी आहे आरोग्यासाठी फायदेशीर?

kitchen Hacks: लंचबॉक्समध्ये दिलेले सफरचंद काळे पडतेय? मग या टिप्स करा फॉलो

Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Special Report : Hatkanangale Lok Sabha | हातकणंगलेत होणार तिरंगी लढत

Uday Samant News | उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT