Sadabhau Khot Latest Marathi News, NCP News Saam TV
महाराष्ट्र

सदाभाऊ खाेतांचा ताफा अडविला; सांगोल्यातील हाॅटेल मालकावर गुन्हा दाखल

भादवि 341,186 आणि 104 कलमानुसार शिनगारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर - रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओत सदाभाऊ यांना एक हॉटेलमालक उधारी चुकवण्याची मागणी करताना दिसून येत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असं म्हणत सांगोला (Sangola) येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने सदाभाऊ यांची वाट अडवली होती. दरम्यान, या प्रकरणी आता हॉटेल मालक अशोक शिनगारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sadabhau Khot Latest Marathi News)

हे देखील पाहा -

शिनगारे यांच्याविरुध्द सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाभाऊ खोत यांचा पंचायतराज समिती दौऱ्यावर असताना ताफा अडवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. भादवि 341,186 आणि 104 कलमानुसार शिनगारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्व प्रकारामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

सदाभाऊंची वाट कुणी अडवली?

गुरूवारी सदाभाऊ खोत हे सोलापुरातील सांगोला येथे आले होते. दुपारी पंचायत समितीच्या आवारात ते आले असताना, त्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोरच सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने अडवलं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असं म्हणत अशोक शिनगारे यांनी भररस्त्यात सदाभाऊंची वाट अडवली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी हॉटेल मालकाची समजूत काढून सुटका करून घेतली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT