Dhule News Saam TV
महाराष्ट्र

Dhule: पुण्यातील मुक्कामी बस चालकाची धुळ्यात आत्महत्या

कंडक्टर बस स्थानकातील विश्रामगृहात झोपण्यासाठी गेला असता चालक देवरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे -

धुळे : पुण्यातील (Pune) एसटी बस डेपोमधील चालकाने धुळे येथील मुख्य मध्यवर्ती बस स्थानकात बेल वाजवण्याच्या दोरीच्या सहाय्याने बसमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली आहे. (Dhule Main Central Bus Station)

पुण्यातील शिवाजीनगर डेपोची ही बस असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली असून हिरामण नाथा देवरे वय ५७, राहणार पुणे असं बस चालकाचं नाव आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धुळ्यातील (Dhule) मध्यवर्ती बस स्थानकात पुणे-धुळे बस दाखल झाली.

पाहा व्हिडीओ -

त्यानंतर चालक देवरे यांनी कंडक्टरसोबत जेवण केले. त्यानंतर कंडक्टर बस स्थानकातील विश्रामगृहात झोपण्यासाठी गेला असता चालक देवरे यांनी पुणे- धुळे बसमध्येच बेल वाजवण्याच्या दोरीच्या साह्याने गळफास लावत आत्महत्या केली.

ही घटना शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली. घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे स्थानिक अधिकारी व शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी चालक देवरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केला आहे.

प्रथमदर्शनी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत, परंतु चालकाने गळफास का घेतला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT