Hingoli Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli Bus Accident : कळमनुरी आगाराची 28 प्रवासी घेऊन जाणार बस उलटली, अनेक जण जखमी

जखमींना कळमनुरीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

संदीप नागरे

Kalamnuri Bus Accident : हिंगोली मध्ये सलग दुसऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा अपघात झाला आहे. काल हिंगोली परभणी महामार्गावर सकाळी पाच वाजता अपघात झाला होता त्यानंतर आज पुन्हा हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मसोड पाटीवर कळमनुरी आगाराची बस उलटून अपघात झाला. या बस मध्ये 28 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली असून, हे सर्व प्रवासी हिंगोली व कळमनुरी तालुक्यातील रहिवासी आहेत.

यामध्ये शाळकरी विद्यार्थिनीसह सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, जखमींना कळमनुरीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस समोरील भागात असलेला लोखंडी पाटा तुटल्याने, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली आणि हा अपघात झाला. यामध्ये बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 28 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ८ जण जखमी आहेत. जखमींना कळमनुरीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT