Solapur News Saam TV
महाराष्ट्र

Solapur News: विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे, काळ्या म्हशीनं चक्क पांढऱ्या शुभ्र रेडकूला दिला जन्म; दुर्मिळ दृश्य पाहायला सारं गाव जमलं

काळ्या म्हशीच्या पोटी जन्मलेल्या पांढऱ्या पिल्लाला पाहण्यासाठी संपूर्ण गावाने गर्दी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Solapur News: सोशल मीडियावर नेहमीच थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सोलापूरातील मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात अशीच चकित करणारी एक घटना घडली आहे. एका काळ्या म्हशीने चक्क गाईच्या वासरा प्रमाणे पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिला आहे. काळ्या म्हशीच्या पोटी जन्मलेल्या पांढऱ्या पिल्लाला पाहण्यासाठी संपूर्ण गावाने गर्दी केली आहे. सोशल मीडियावर या वासराची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, वडवळ येथील अल्पभूधारक शेतकरी (Farmer) राजकुमार कोटीवाले यांच्या म्हशीने पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे. राजकुमार यांचा शेतीसह पशुपालनाचा व्यवसाय आहे. आपल्या म्हशीने पांढऱ्या रेडकाला जन्म दिल्याने त्यांना देखील याचं मोठं नवल वाटतं आहे. आजवर त्यांनीही पहिल्यांदाच हे दुर्मिळ दृश्य पाहिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आता पर्यंत काळ्या म्हशीने (Buffalo) अंगावर किंवा डोक्यावर पांढरा डाग असेल्या रेडकाला जन्म दिला असल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र पहिल्यांदाच संपूर्ण पांढऱ्या रेडकूला जन्म दिलेली ही फार दुर्मिळ घटना आहे. सर्वांनाच याचे नवल वाटत आहे. असा अजब प्रकार घडल्यावर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जनुकांच्या मिश्रणामुळे रंगावर परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे. म्हैस आणि रेडकू या दोघांची प्रकृती चांगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोन्याचे दर पुन्हा बदलले; २४, २२ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचार

वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे? हे 7 हेल्दी पदार्थ ठरतील बेस्ट!

रात्रभर झोप घेऊनही दिवसभर सुस्ती असते? काय आहे कारण?

Crime News : त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हिस्ट्रीशीटर गौरवची हत्या, मित्रानेच केला गेम; नागपुरातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT