Walaj MIDC Police Station Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने संपवलं जीवन; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhajinagar News: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर परिसरात मंगळवारी (२० फेब्रुवारी) घडली.

Satish Daud

रामू ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Latest News

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर परिसरात मंगळवारी (२० फेब्रुवारी) घडली. लिना श्रीराम पाटील असं मृत तरुणीचं नाव आहे. लिना गरुडझेप अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करत होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वसतीगृहाच्या बाथमरूममध्ये तिचा मृतदेह आढळून आला. लिनाने इतकंच टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिना श्रीराम पाटील मूळ सावखेडा (ता. पाचोड, जि. जळगाव) गावची रहिवासी होती. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी लिना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात आली होती.

लिनाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी तिचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. डिसेंबर महिन्यात देखील गरुडझेप अॅकडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने बाथरूममध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती.

श्रीकांत दशरथ वाघ (वय १९) असं या तरुणाचं नाव होतं. धक्कादायक बाब म्हणजे श्रीकांतचाही मृतदेह हॉस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. श्रीकांतनंतर आता लिनाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने गरुडझेप अॅकडमीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT