ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात परदेशातून परतले 99 प्रवासी! Saam Tv
महाराष्ट्र

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात परदेशातून परतले 99 प्रवासी!

परदेशातून महापालिका क्षेत्रात आलेल्या 99 प्रवाशांची माहिती महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर या सर्व प्रवाशांशी संपर्क साधून माहिती घेणे आज सुरू होते.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : ओमायक्रॉन व्हेरियंट विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशातून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात एकूण 99 प्रवासी आल्याची नोंद झाली आहे. यापैकी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून आत्तापर्यंत 51 जणांशी संपर्क करण्यात आला असून यापैकी 11 प्रवासी आणि त्यांच्या जवळच्या संपर्कातील 5 जण अशा 16 जणांची आर्टिपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. महापालिकेकडून 20 टिमद्वारे उर्वरित प्रवाशांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. तर महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.

हे देखील पहा :

परदेशातून महापालिका क्षेत्रात आलेल्या 99 प्रवाशांची माहिती महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर या सर्व प्रवाशांशी संपर्क साधून माहिती घेणे आज सुरू होते. यामध्ये लंडन, दुबई, कतार, यूएसई, जपान या भागातून प्रवासी आल्याचे समजल्यानंतर 20 वॉर्डात एकूण 20 टिम आणि 60 आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून परदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू करण्यात आला होता.

परदेशातून आलेल्या एकूण 99 प्रवाशांपैकी 51 जणांशी संपर्क झाला असून त्यातील 11 प्रवासी आणि 5 जवळच्या संपर्कातील 16 जणांचे आर्टीपीसीआरचे नमुने घेण्यात आले आहेत. 99 पैकी 35 प्रवासी हे यापूर्वीच परतले आहेत. संपर्क झालेल्या 11 प्रवासी आणि जवळच्या संपर्कातील 5 अशा 16 जणांना वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून दोन दिवसात आर्टिपीसीआरचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेणेत येईल अशी माहिती डॉ.वैभव पाटील यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: उन्हाळा सुरु झाल्यावर केसात अचानक कोंढा वाढलाय? मग आठवडाभर वापरा 'हे' तेल

मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा; रविवारी प्रवाशांचे मेगा हाल होणार, कसं असेल वेळापत्रक?

Accident: मंत्र्यांच्या कारला महामार्गावर भीषण अपघात, वाहनाचा चुराडा; जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

पदे बोगस, पदव्याही बोगस! मुंबईच्या कॉलेजचा मोठा घोटाळा उघड; १३२ विद्यार्थ्यांची फसवणूक

Maharashtra News Live Update: लातूरच्या उदगीर शहरासह तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT