ऑनलाइन गिफ्टच्या अमिषापोटी 98 हजार गमावले ! SaamTv
महाराष्ट्र

ऑनलाइन गिफ्टच्या अमिषापोटी 98 हजार गमावले !

मोबाइल वर फ्री गिफ्टचे मेसेज किंवा फोन येत असतील तर सावधान !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत घोरमारे

भंडारा - ऑनलाइन फ्री ग्रिफ्ट च्या मागे लागाल तर पैसे गमवुन बसाल ! मोबाइल वर फ्री गिफ्टचे मेसेज किंवा फोन येत असतील तर सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कुपन स्क्रॅच करा फ्री गिफ्ट मिळवा. असे मेसेज किंवा फोन आजकाल आपल्या प्रत्येकाला कधी न कधी येत असतातच. 98 Thousand lost due to online gift craving!

मात्र अश्या भूलथापांना बळी पडून आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. अश्याच फ्री गिफ्टच्या अमिषापोटी भंडारा शहरातील तरुणीला एका भामटयाने तब्बल 98 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

हे देखील पहा -

भंडारा शहरात राहणाऱ्या दीपाली यांना अनोळखी इसमाने फोन करून तुम्ही शॉपिंग केल्याने तुम्हाला 5 हजार रूपयांचे गिफ्ट मिळणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला दिपालीला यावर विश्वास बसला नाही मात्र या भामटयाने अत्यंत चलाखीने व विश्वासात घेऊन 98 हजारांना गंडा घातला आहे.

तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे असे अमिष देऊन या तरुणीला हा भामटा पैशांची मागणी करत होता. वेगवेगळ्या पद्धतीने तरुणीकडून 5 वेळा एकूण 98 हजार रूपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात हा सायबर भामटा यशस्वी झाला आहे.

मात्र पैसे देऊनही गिफ्ट काही आले नाही. त्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणीने भंडारा शहर गाठत भंडारा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. गिफ्टच्या अमिषाला बळी पडून पीडित तरुणीने वारंवार पैसे भरले पण तिच्या हाती काही लागले नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असून सायबर सेलकडून वारंवार सूचना देण्यात येत असून देखील नागरिक याला बळी पडत असतील तर दुर्दैवच मानावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT