9 yr old boy died after lightning strike nearby him in chhatrapati sambhajinagar Saam Digital
महाराष्ट्र

संभाजीनगर: विजेच्या कडकडाटाने भेदरून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Latest Marathi News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ येथे सायंकाळी, रात्रीच्या वादळीवारासह पाऊस झाला. यामुळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

पावसापासून सरंक्षण व्हावे या हेतुने लिंबाच्या झाडाखाली आडोशाला आजोबांसह थांबलेल्या बहीण भावांपैकी एका नऊ वर्षीय बालकाच्या काही अंतरावर वीज पडली. यामुळे बालक भेदरला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ येथे सायंकाळी, रात्रीच्या वादळीवारासह पाऊस झाला. यावेळी विजेच्या कडकडाट ही हाेत हाेता. सिद्धेश्वर अंकुश पाचे (वय 9) हा त्याच्या आजाेबांसमवेत शेतीवर गेला हाेता. (Maharashtra News)

आडूळ येथे सायंकाळी अचानक पाऊस सुरु झाला. त्यापासून सरंक्षणासाठी सर्वजण लिंबाच्या झाडाखाली आडोशाला थांबले. त्याच वेळी काही अंतरावर वीज पडली. त्यात सिद्धेश्वर भेदरला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. या घटनेने पाचे कुटुंबांना माेठा धक्का बसला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT