80 रुग्णांचा मृत्यूला डॉ. दुदणकर जबाबदार - युवराज गायकवाड विजय पाटील
महाराष्ट्र

त्या 80 मृत्यृंना डॉ. दुदणकर जबाबदार...

डॉ.महेश दुदणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी केली आहे.

विजय पाटील

सांगली- शहरातील डॉ.महेश दुदणकर dr. mahesh dudankar यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ncp माजी नगरसेवक युवराज गायकवाड yuvrj gaikwad यांनी केली आहे. कोरोना उपाचाराखाली दुदणकार हॉस्पिटल मध्ये झालेल्या 80 रुग्णांचा मृत्यूला डॉक्टर दुदणकर कारणीभूत असल्याचा आरोप करत दुदणकर हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्यावर कारवाई करावी, अन्यथा 12 जुलै रोजी महापालिकेसमोर आंदोलन protest करण्याचा इशारा माजी नगरसेवक गायकवाड यांनी दिला आहे.

हे देखील पहा-

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी भरमसाठ पैसे रुग्णांच्या नातेवाईकांकडून उकळले आहेत. अनेकांनी धंदाच मांडला आहे. माणसाच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग डॉक्टरकडून सुरू आहे. सांगली मिरज रोडवरील अपेक्स हॉस्पिटल apex hospital गाजत असताना आता डॅ. महेश जाधव नंतर डॉ. महेश दुधणकर यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे.

सांगलीच्या लव्हली सर्कलला दुधणकर यांचा कोव्हीड दवाखाना covid hospital आहे. त्यांनी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून भरमसाठ बिले आकारली आहेत .तसेच मृत्यूचे प्रमाणही मोठ्या संख्येने आहे. त्यांना परवाना महापालिकेने कसा दिला या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. जर या डॉक्टरांना आयुक्त आणि आरोग्य अधिकारी पाठीशी घालत असतील तर त्याच्यावर ही मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा इशारा माजी नगरसेवक गायकवाड यांनी दिला आहे.

Edited by - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT