तरुणाई आणि लहान मुलांच्या मोबाईलच्या व्य़सनानं पालकवर्ग त्रस्त असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र आता वृद्ध मंडळीनाही मोबाईलमुळे वेड लागायची पाळी आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७५ वर्षीय
आजीबाई इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्याच्या इतक्या आहारी गेल्या की, त्यांना तहान-भूक आणि दैनंदिन व्यवहारांचेही भान राहिले नाही. कुटुंबीयांनी मोबाइल काढून घेतल्यानंतर त्यांनी आदळआपट सुरु केली. अखेर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. गोष्ट इथंच थांबत नाही. मोबईलचं वेड इतक्या थरापर्यंत गेलं की रुग्णालयात उपचार सुरू असतानाही आजीबाईंनी पाच रुग्णांचे मोबाइल स्वतःच्या पिशवीत लपून ठेवले. मात्र 15 दिवसांच्या उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आजींच्या या व्यसनावरुन डॉक्टरांनी वृद्ध मंडळींबाबत दक्षता घेण्याचं आवाहन केलंय.
- आजीबाईंचा मनोरंजनासाठी सुरू झालेला हा प्रवास हळूहळू व्यसनात बदलला. 18-18 तास त्या मोबाईल पाहत असायच्या. रिल्सपासून ते क्राईम, मनोरंजनापर्यंतचा कॉन्टेन्ट त्या पहायच्या. त्यामुळे त्यांची झोप कमी झाली. कानात आवाज येऊ लागले. परिस्थिती गंभीर झाल्याने अखेर कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तुमच्या घरातही कुणी मोबाईलच्या आहारी गेला असेल...तर वेळीच सावध व्हा....कारण दारु, सिगारेट, तंबाखुची नशा जसं तुमचं शरीर पोखरतं तसं सतत मोबाईल पाहणं हे तुमचं मन पोखरतं..आणि तुमचं आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे मुलांप्रमाणेच मोठ्यांनीही मोबाईलपासून खबरदारी घेण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.