Crime News Saam tv
महाराष्ट्र

नात्याला काळिमा! वासनांध आजोबाचा चिमुरड्या नातीवर लैंगिक अत्याचार

आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास

वर्धा - लैंगिक अत्याचाराचे अनेक गुन्हे उजेडात येत असून त्यांना न्यायालयाकडून शिक्षा ही सुनावल्या जातं आहे. तरीही असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या मानसिकतेत कुठलाही बदल होत नसल्याचे पहावयास मिळत आहे. स्वतःच्या नातीवर आजोबाने अत्याचार केल्याची घटना वर्धेच्या रामनगर परिसरात उघडकीस आली आहे. आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना गुरुवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी एका 70 वर्षीय नराधम आजोबाने अवघ्या 7 वर्षीय चिमुकल्या नातीवर अत्याचार केला आहे.

रामनगर पोलिसांनी (Police) याप्रकारणी नराधम आजोबाला अटक केली आहे. महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे महिला आणि तिची सात वर्षीय मुलगी रामनगर हद्दीत घर असलेल्या तिच्या आई-वडिलांकडे दीड वर्षांपासून राहत आहे.

हे देखील पाहा -

रात्रीच्या सुमारास सगळे घरी असताना अचानक चिमुरडीच्या आजीचा ओरडण्याचा आवाज आला. चिमुरडीच्या आईने धाव घेतली असता आपल्याच पोटच्या मुलीवर वडिलांना अत्याचार करताना पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

नराधम 70 वर्षीय आजोबा त्याच्या खोलीत चिमुरडीशी अनैसर्गिक कृत्य करताना दिसला. महिलेने थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ वासनांध आजोबास अटक केली.

वासनांध आजोबा त्याच्या खोलीत नातीसोबत दुष्कृत्य करताना दिसला. हे पाहून आजीने जोरजोरात आरडाओरडा केला. आजी ओरडल्याचे पाहून चिमुरडीच्या आईनेही खोलीकडे धाव घेतली आणि हे बिंग फुटले. चिमुरडीने घडलेला सर्व प्रकारच्या आईला सांगितला आणि थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT