Sangli Crime Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime: सांगलीतील धक्कादायक घटनेनं खळबळ; धर्मांतरासाठी छळ, ७ महिन्यांच्या गर्भवतीची आत्महत्या

Sangli Police: सांगलीमध्ये भयंकर घटना घडली. धर्मांतरासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेचा नवरा, सासू आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने सांगलीत खळबळ उडाली आहे.

Priya More

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये एका ७ महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून या विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पतीसह सासू-सासरे या तिघांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत कुपवाडा या ठिकाणी ही घटना घडली. ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋतुजा सुकुमार राजगे, (२७ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ६ जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन या आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून ऋतुजाला धर्मांतर करण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले.

सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ऋतुजाचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सुरेश राजगे आणि अलका राजगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगलीतील कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. 'सुकुमार राजगे कुटुंबाकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती, या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप मृत ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT