Hospital Saam tv
महाराष्ट्र

Durga Devi Visarjan 2023 : जनरेटरच्या स्फोटानंतर जिवाच्या आकांताने ओरडत होते सात चिमुकले, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीस गालबाेट

सर्व जखमींना पुण्यात नेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

ओंकार कदम

Mahableshwar News : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर शहरातील कोळी आळी परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत (Durga Devi Visarjan 2023) जनरेटरचा स्फोट झाला. या घटनेत सात लहान मुले आणि एक युवक जखमी झाला आहे. जखमींना पुण्यातील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी दिली. (Maharashtra News)

महाबळेश्वर येथील कोळी आळीतील दुर्गा माता मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीत जनरेटरच्या पेट्रोलच्या पाईपला गळती लागली. त्यानंतर जनरेटरने पेट घेतला. यात मोठा स्फोट झाल्याने मिरवणुकीला लागबाेट लागला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेत देवीच्या मूर्तीजवळ बसलेली सात छोटी मुले गंभीर जखमी झाली तसेच एकाचा युवकाचा देखील जखमीत समावेश आहे. भाजलेली मुले जिवाची आंकताने आेरडत हाेती. ही सर्व मुले आठ वर्षापर्यंतची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या दुर्घटनेनंतर जखमींना साताऱ्यात त्यानंतर पुण्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख तसेच आमदार मकरंद पाटील हे तिघे संपुर्ण परिस्थितीवर जातीने लक्ष ठेवून हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT