Badalapur News Saam tv
महाराष्ट्र

Badalapur News: बदलापूर नगरपालिकेत ६०० कोटींचा घोटाळा; काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांचा आरोप

बदलापूर नगरपालिकेत ६०० कोटींचा घोटाळा; काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांचा आरोप

अजय दुधाणे

बदलापूर : बदलापूर नगरपालिकामध्ये गेल्या तीन वर्षात ६०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी केला आहे. या भ्रष्टाचारा (Badalapur) विरोधात एसटीआयची चौकशीची मागणी संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेत्यांकडे केली आहे. (Maharashtra News)

सन २०२० ते २०२३ पर्यंत ११०० कोटी रुपये बदलापूर नगरपालिकेकडे जमा असून प्रशासकीय खर्च आणि इतर खर्च पकडून पालिकेने ५०० कोटी रुपये खर्च केले. तर उर्वरित ६०० कोटींचा महाभ्रष्टाचार महाघोटाळा या शहरांमध्ये झाला असल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांनी केला. याबाबत आज काँग्रेस कार्यालयात संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेण्यात आली. कोविड काळामध्ये झालेला भ्रष्टाचारा, विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार असे अनेक भ्रष्टाचार झालेल्या आरोपांचा पुरावा हाती घेऊन ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.

६० टक्‍के काम बोगस

भ्रष्टाचारामध्ये (Congress) प्रशासकीय आणि मुख्याधिकारी यांनीच हा भ्रष्टाचार केला आहे. यामध्ये दीपक पुजारी आणि योगेश गोडसे यांच्या काळात झालेला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारामध्ये जो कोणी अधिकारी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये तीन वर्षाच्या कालखंडामध्ये १५०० बोगस ठराव त्यांनी केले. दहा दहा लाखांचे तुकडे तुकडे करूनही केले. त्याला कोणत्याही प्रकारची तांत्रिक मंजुरी नाही. जिल्हाधिकाऱ्यांची त्याला मंजुरी नसताना काही विशिष्ट मरजीतील लोकांना ही काम दिली गेली आहेत आणि निव्वळ फक्त एक कागदावरच हे काम राहिलेली आहे. त्यामधली ६० टक्‍के काम ही बोगस आहेत. तर ४० टक्‍के काम जी केली ती सुद्धा निकृष्ट दर्जाची काम झालेली आहेत असा आरोप देखील संजय जाधव यांनी केला आहे. यावी महाविकास आघाडीचे अविनाश देशमुख हे देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT