धक्कादायक : 60 वर्षीय महिलेची धारधार शस्त्राने हत्या.. नोकर आढळला विष पिलेल्या स्थितीत लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

धक्कादायक : 60 वर्षीय महिलेची धारधार शस्त्राने हत्या.. नोकर आढळला विष पिलेल्या स्थितीत

घरात काम करणाऱ्या 40 वर्ष जुन्या नोकरानेच खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून भीमा असं संशयित नोकराच नाव आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालना (Jalna) येथे एका 60 वर्षीय महिलेचा तीक्ष्ण हत्याऱ्याने खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, तर त्याच महिलेच्या घरातील नोकर देखील बेशुद्ध अवस्थेत घरामध्ये सापडला आहे.

हे देखील पहा -

जालन्यातील हॉटेल अंबर समोरील उच्चभ्रू वस्तीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून संगीता आलोक पोहोटी वय 60 असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर यांच्याच घरातील नोकर सुद्धा ही घरात विष पिलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दरम्यान नोकर आढळलेली खोली आतून बंद केलेली होती. नोकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून नोकरावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालक आणि नोकरामध्ये वाद असल्याने नोकराने मनात राग धरून मालकिणीचा खून. केल्याचा संशय पोलिसांना असून खून केल्यानंतर नोकराने विष प्राशन करून स्वतःला घरात कोंडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

40 वर्ष जुना घरात काम करणाऱ्या नोकराने खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून भीमा अस संशयित नोकराच नाव असून या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, भाजपचे बंडखोर प्रा. अनिल सोले यांची अखेर माघार

नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT