Nanded Mukhed Police station saam tv
महाराष्ट्र

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

Nanded Crime News : एका २२ वर्षीय तरुणाने ६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Saam Tv

  • नांदेडमधील मुखेड येथे संतापजनक घटना

  • ६ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय तरुणाने केले अत्याचार

  • क्लासहून परतत असताना नराधमाने केले कृत्य

  • आरोपीला केली अटक, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यासाठी प्रयत्न

संजय सूर्यवंशी, नांदेड | साम टीव्ही

नांदेडमधील मुखेडमध्ये एका ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. या संशयिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देगलूरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी दिली.

नांदेडच्या मुखेडमध्ये काल, शुक्रवारी (7 नोव्हेंबर) ही धक्कादायक घटना घडली. २२ वर्षीय तरुणाने ६ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केले. पीडित मुलगी संध्याकाळच्या सुमारास खासगी शिकवणीहून घरी परतत होती. त्यावेळी आरोपीनं तिला वाटेत गाठलं. तिच्यावर अत्याचार केले.

ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. त्याच्याविरोधात मुखेड पोलीस ठाण्यात आज, शनिवारी विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलीस ठाण्यात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू

पीडित मुलीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देगलूरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी दिली. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा आणि आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT