पहा व्हिडीओ : शाळेत मन रमत नसल्याने 5 वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

पहा व्हिडीओ : शाळेत मन रमत नसल्याने 5 वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

पाचवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेत मन रमत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील (Nashik) सुरगाणा तालुक्यामध्ये घडली आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : पाचवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेत मन रमत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील (Nashik) सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर निवासी आश्रमशाळेत घडली आहे. अनिता भोये वय 12 वर्ष असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे.

अनिता भोये या विद्यार्थिनीनं निवासी आश्रमशाळेतचं दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोरोना काळात बरेच दिवस घरी असल्यानं पुन्हा आश्रमशाळेत आल्यावर मन रमत नसल्यानं तिला पुन्हा घरी जाण्याची इच्छा होती. मात्र पालक तिला घरी घेऊन जायला येण्याआधीचं तिनं आत्महत्या केल्यानं सुरगाण्यात खळबळ उडालीय.

पहा व्हिडीओ -

सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील आश्रमशाळेत (Ashram School) ही मुलगी शिकत होती मात्र, शाळेत तिचं मन रमत नव्हते शिवाय ही निवासी आश्रमशाळा आहे. त्यामुळे आई-वडिलांना सोडून तिला इथे रहावे लागात असे. तिला घराची सतत आठवण यायची. याच विचारात ती असायची. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अवघ्या बारा वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याने जिल्हा हादरला आहे.

शिवाय या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तिने लोखंडी रॉडला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. सकाळी-सकाळी आश्रमशाळेच्या निवासस्थानासमोर हे भीषण दृश्य पाहून अनेकजण भेदरून गेले. दरम्यान पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT