Shocking News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: मुदत संपलेले चॉकलेट खाल्ल्याने 50 ते 60 मुलांना विषबाधा; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Expired Chocolate News: वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगरातील एका मॉलमध्ये मुदत संपलेल्या 45 रुपयांच्या चॉकलेटची अवघ्या 10 रुपयांत विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Shivani Tichkule

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News: वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगरातील एका मॉलमध्ये मुदत संपलेल्या 45 रुपयांच्या चॉकलेटची अवघ्या 10 रुपयांत विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे चॉकलेट खाल्ल्याने 50 ते 60 मुलांना मळमळ, चक्कर आल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले. (Latest Marathi News)

हा सर्व प्रकार लक्षात येताच पालकांनी मॉलमध्ये (Mall) धाव घेत व्यवस्थापकांना जाब विचारत धारेवर धरले. प्रकरण वाढत असल्याने पालकांनी 112 क्रमांकावर कॉल केला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी अन्न-औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्याची सूचना केल्यानंतर पालक घरी परतले. याप्रकरणी मॉलच्या विरोधात अन्न-औषध प्रशासनाकडे तक्रार दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर या सर्व मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

स्टिकर हटवताच चॉकलेटची मुदत दिसली

पालकांसोबत मॉलमध्ये गेलेल्या एका मुलाने ऑफरमध्ये चॉकलेट खरेदी केले. त्यानंतर त्याने ही बाब आपल्या इतर मित्राला सांगितली. पालकांनी घेऊन दिलेल्या पॉकेटमनीतून त्या मित्रानेही दोन चॉकलेट (Chocolate) खरेदी केले. दुकानाबाहेर येताच त्याने एक चॉकलेट खाल्ले.

त्यानंतर त्या मुलाला मळमळ व चक्कर येऊ लागली. मुलाने चॉकलेटच्या वरचे ऑफरचे स्टिकर बाजूला करत त्याची मुदत तारीख तपासून बघितली. तेव्हा त्या चॉकलेटची मुदत २५ जून २०२३ रोजीच संपलेली होती. त्याने घरी गेल्यावर घडलेला प्रकार पालकांना सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT