धक्कादायक! 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; रोह्यातील घटना राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

धक्कादायक! 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; रोह्यातील घटना

आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी मात्र फरार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : रोहा Roha Raigad तालुक्यात दिवाळीच्या पूर्व संध्येला माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. घराच्या अंगणात खेळत असलेल्या 5 वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाने बलात्कार Secual Assault on 5 year Old Minor Girl केल्याची संतापजनक घटना घडली आहे. राकेश शिर्के (वय 36 रा. हाळ विरझोली) असे या नराधमाचे नाव आहे. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात Roha Police Station पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राकेश हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित मुलीवर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे देखील पहा-

खेळता खेळता पीडित मुलगी अचानक बेपत्ता;

रायगड जिल्हातील रोहा तालुक्यातील हाळ विरझोली येथे राहणाऱ्या अवघ्या 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. पीडित  मुलगी ही 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास  अंगणात खेळत होती. खेळता खेळता पीडित मुलगी अचानक बेपत्ता झाली. अंगणात खेळत असलेली चिमुकली दिसत नसल्याने तिच्या आजी आजोबानी आजूबाजूला शोध घेतला. त्यावेळी शेजारी राहणारा इसम राकेश उमाजी शिर्के याने तिला आपल्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग केला असल्याचे समजले.

आरोपी फरार;

आरोपी राकेश हा चंद्रकात पाटील यांच्या चाळीत भाडेकरू म्हणून राहत होता. या संतापजनक प्रकाराची माहिती पीडितेच्या आजी आजोबानी  मिळाल्यानंतर त्यांनी घर मालकाला सांगितले घर मालकाने आरोपीस विचारले असता त्याने तिकडून पळ काढला. पीडित  मुलीच्या घरच्यांनी रोहा पोलीस  ठाण्यात तक्रार केली. तसेच पीडितेला त्रास होत असल्याने तिला अलिबाग येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संशयित आरोपी राकेश शिर्के याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात अली आहे. पुढील तपास श्रीमती व्ही.व्ही. चव्हाण उपविभागिय पोलीस अधिकारी पेण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे  करीत आहेत.

नराधमांना नक्की शिक्षा कधी होणार?

रोहा तालुक्यातील तांबडी या गावातील दहावीत शिकत असलेल्या मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्यात आल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. या घटनेतील आरोपीविरोधात माणगाव न्यायालयात खटला सुरू आहे. तर पेण मध्येही 2 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारल्याची घटना घडली होती. याबाबतही अजुन न्यायालयात खटला सुरू आहे. आता रोह्यात दुसरी घटना घडली असून या नराधमांना नक्की शिक्षा कधी होणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT