Parbhani News: saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : खपाट पिंपरीत 45 जणांना विषबाधा, दाेघे गंभीर

काही जणांना किरकोळ आजार राहिल्याने त्या रुग्णांना औषधोपचार देण्यात आले.

राजेश काटकर

Sonpeth News : सोनपेठ तालुक्यातील मौजे खपाट पिंपरी येथे तेरवीच्या जेवणाचा कार्यक्रमात 45 जणांना विषबाधा झाली. या घटनेनंतर दाेन जण गंभीर झाल्याची माहिती समाेर आली आहे. दरम्यान काही जणांना किरकोळ आजार राहिल्याने त्या रुग्णांना औषधोपचार देऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. (Maharashtra News)

खपाट पिंपरी येथे एका कुटुंबात शनिवार रोजी तेरवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात शंभर ते दीडशे लोकांनी जेवण केले. त्यानंतर जेवण केलेल्या लोकांपैकी काही जणांना रविवारी मळमळ, उलटी, चक्कर व जुलाबाचा त्रास झाला.

त्यापैकी 40 ते 45 व्यक्तींना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये 20 लोकांना किरकोळ उपचार देण्यात आला व 22 नागरिकांना येथील ग्रामीण रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यामधील गंभीर आजारी असलेल्या दाेघांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले. वेळेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांनी निर्णय घेऊन खपाट पिंपरी येथे आरोग्य कर्मचारी यांचे पथक रवाना करत गावातील घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले.

यामध्ये चार रुग्णांना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. काही जणांना किरकोळ आजार राहिल्याने त्या रुग्णांना औषधोपचार देण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT