Raigad Saam
महाराष्ट्र

Raigad News: देवीची आरती सुरू असताना भक्तांवर मधमाशांचा हल्ला; १३ चिमुकल्यांसह ४२ जण जखमी

Mass Bee Attack on Devotees: रायगडमध्ये देवीच्या आरतीदरम्यान मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. या हल्ल्याात ४२ ग्रामस्थ जखमी झाले असून, यात १३ लहान मुलांचा समावेश आहे.

Bhagyashree Kamble

सचिन कदम, साम टीव्ही

ग्रामदेवीची आरती सुरू असताना ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात ४२ ग्रामस्थ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये १३ लहान मुलांचा समावेश असून, जखमींवर ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील म्‍हसळा तालुक्‍यातील गावात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कोळवट गावात ग्रामदेवीच्या आरतीदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. अचानक मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला चढवला. यावेळी ग्रामस्थ प्रचंड घाबरले. अनेकांवर मधमाशांनी डंख मारले. यामुळे काही ग्रामस्थ गंभीररित्या जखमी झाले.

सर्व जखमींना तातडीने ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले असून, त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. काही गंभीर अवस्थेत असलेल्या रूग्णांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.

आरतीसारख्या धार्मिक कार्यक्रमात घडलेली ही घटना दुर्दैवी असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. गावात मधमाशांचे पोळे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT