Beed : उसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून 4 वर्षीय चिमुकली ठार विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed : उसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून 4 वर्षीय चिमुकली ठार

उसाच्या फडात ट्रॅक्टर भरल्यानंतर ते मागे घेतांना, टायरखाली चिरडून एका 4 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

विनोद जिरे

बीड : उसाच्या फडात ट्रॅक्टर भरल्यानंतर ते मागे घेतांना, टायरखाली चिरडून एका 4 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना, कर्नाटकमध्ये घडली आहे. प्रेरणा किशोर कारके (वय- 4) रा.देवगाव ता.वडवणी जि. बीड असे त्या चिमुकलीचे नाव आहे. बीडच्या वडवणी जवळील देवगांव या ठिकाणी ऊसतोड मजूर, किशोर कारके हे आपल्या चिमुकलीला घेवून नुकतेच कर्नाटकला उस तोडणीसाठी गेले होते.

हे देखील पहा-

किशोर हनुमंत कारके हे उसतोड कामगार आहेत. १८ ऑक्टोंबर २०२१ दिवशी कारखान्याला गेले होते. यावेळी २८ ऑक्टोंबर २०२१ रोजी ऊसाच्या फडात ट्रॅक्टर भरल्यानंतर ते मागे घेतांना, प्रेरणा हिला ट्रॅक्टरने चिरडल्याने तिचा दुदैवी मृत्यू झाला. याबाबतचा गुन्हा नोंद होवू नये, म्हणून वाहन मालकांनीच अरेरावीची भाषेचा वापरत मयत मुलीचे आजोबा गणेश विठ्ठलराव कसाब आणि आजी यांना दडपशाही करत घटनेच्या ठिकाणाहून गांवाकडे हकलून दिले आहे.

वडवणी आणि बीड येथील समाजिक स्तरावरील शिष्टमंडळ उद्या कारखान्याची भेट घेऊन झालेल्या अन्यायाची आणि घटनेची माहिती देणार आहेत. ही घटना कर्नाटक राज्यातील हिमरस या कारखान्या अंतर्गत तैराना ता. संकेसर जि. बेलगांव या ठिकाणी घडली आहे .

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

Maharashtra News Live Update: स्मार्ट टॉयलेट बनले ड्रग्ज तस्करांचा अड्डा, मकोकाच्या आरोपीसह तिघे जेरबंद

Lionel Messi: इतिहास रचणाऱ्या लिओनेल मेस्सीला फायनलपूर्वी बसला मोठा धक्का, एम्बाप्पेने एका रात्रीत बदललं सगळं समीकरण

Gold Rate Today India : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! 7 दिवसांत सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

Dal Tadka Recipe : संडे स्पेशल मेन्यू! घरी बनवा ढाबा स्टाईल डाळ तडका, चव अशी की सगळेच रेसिपी विचारतील

SCROLL FOR NEXT