Sangli Rain Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: कृष्णा नदीत गेला अन् परतलाच नाही, मगरीने चेहरा अन् दंडाचा वचपाच काढला; सांगलीत खळबळ

Crocodile attack in Krishna River: कृष्णा नदीमध्ये पोहायला गेल्यावर मगरीने तरूणावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

विजय पाटील, साम टीव्ही

कृष्णा नदीमध्ये पोहायला गेल्यावर मगरीने तरूणावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा तरूण सांगलीतील अंकलखोप येथील रहिवासी आहे. तरूण बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. नंतर पोलिसांनी आणि वन विभागाने शोध घेतला असता, त्याचा मृतदेह सापडला. या प्रकरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजित गायकवाड (वय वर्ष ३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास अजित हा अंकलखोपमधील कृष्णा नदी पात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता. मात्र, काही वेळानंतर तो बेपत्ता झाला होता. अजित संध्याकाळ झाली तरीही घराकडे न आल्यामुळे नातेवाईकांनी नदीच्या दिशेने धाव घेतली.

नदीजवळ काहींनी शोधाशोध केली. तरीही अजित काही सापडला नाही. दरम्यान, नदीकाठी अजितची चप्पल आणि कपडे आढळून आले होते. नातेवाईकांनी थेट वन विभाग आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी शोध घेतला असता अजितचा मृतदेह भिलवडीच्या हाळभाग येथे सापडला.

अजितचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या शरीराचे मगरीमे हालहाल केले होते. ज्यामध्ये त्याच्या हाताच्या दंडाचा भाग आणि चेहऱ्याचा भाग मगरीने खाल्ला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं असून, वन विभागाकडून कृष्णा नदी पात्रामध्ये जाताना खबरदारी बाळगण्याचा आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT