Jalna Accident News, gevrai, msrtc bus  saam tv
महाराष्ट्र

Jalna Accident News : जालना- अंबड महामार्गावर यात्रा स्पेशल बसला अपघात, 30 प्रवासी जखमी

घटनास्थळी पाेलिस पाेहचले असून पंचनामा करीत आहेत.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Breaking News : जालना - अंबड महामार्गावर (jalna ambad highway) राज्य परिवहन महामंडळाची (msrtc) गेवराई (gevrai) आगाराची यात्रा स्पेशल बस उलटून (msrtc bus accident) सुमारे 30 प्रवासी जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Breaking Marathi News)

जालन्याहुन बीडकडे जाणाऱ्या महामंडळाच्या गेवराई आगाराच्या यात्रा स्पेशल बसला गोलापांगरी टोलनाक्या अंबडकडून येणाऱ्या जड वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यांमध्ये जाऊन उलटल्याची घटना घडली.

या बसमध्ये सुमारे 50 प्रवासी हाेती. या अपघातात (jalna accident) 30 प्रवाशी जखमी झाले आहेत. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी बस मधील प्रवाशांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि जालना आगाराचे कर्मचारी दाखल झाले. सध्या पाेलिस पंचनामा करीत आहेत. तसेच 30 जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्र्याचे निधन; विधानभवनात पार्थिवाचे अंतिम दर्शन, मुख्यमंत्री, आमदारांनी वाहिली श्रद्धांजली

Railway Rules : प्रवाशांनो रेल्वेचं तिकीट रद्द करण्यापूर्वी वाचा 'हे' नवे नियम, नाहीतर मिळणार नाही रिफंड

Maharashtra News Live Update: सर्वधर्मसमभावाचा संदेश देत संत महमंदखान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

Marathi Actress : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीने खरेदी केली लग्जरी कार, नव्याकोऱ्या गाडीसोबत शेअर केला PHOTO

SCROLL FOR NEXT