Bhandara Latest News Saam TV
महाराष्ट्र

Bhandara News: सोसाट्याचा वारा सुरू असताना चिमुकली खाऊ आणण्यासाठी दुकानात निघाली; वाटेतच घडली भयानक घटना

Bhandara Latest News: सोसाट्याचा वारा सुरू असताना किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी निघालेल्या एका ३ वर्षीय चिमुकलीच्या अंगावर भिंत कोसळली. या घटनेत तिचा दुर्देवी अंत झाला.

अभिजित घोरमारे

Bhandara Latest News: भंडारा जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. सोसाट्याचा वारा सुरू असताना किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी निघालेल्या एका ३ वर्षीय चिमुकलीच्या अंगावर भिंत कोसळली. या घटनेत तिचा दुर्देवी अंत झाला. जिह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात ही दुर्देवी घटना घडली. देविका प्रकाश दिघोरे ( वय 3 वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील मृतक देविका गावातीलच एका किराणा दुकानात खाऊ खरेदी करण्यासाठी जात होती. यावेळी अचानक वादळीवारा सुरू झाला. (Latest Marathi News)

या वाऱ्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेषराव ऋषी मेघराज यांच्या घराची मातीची भिंत तिच्या अंगावर कोसळली. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. दरम्यान, ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ विटा बाजूला सारत जखमी देविकाला बाहेर काढलं.

त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी स्थानिक लाखांदूर (Bhandara) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देविकाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC: सहा महिन्यांत नव्या गाड्या, BMCत उधळपट्टी; पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ नको, इनोव्हा हवी

NDA प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठी? अमित शाहांनंतर सुनील तटकरे मोदींना भेटले

Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर साईभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू,२० जण जखमी

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

SCROLL FOR NEXT