Rupalitai Chakankar Saamtv
महाराष्ट्र

Rupali Chakankar: धक्कादायक! राज्यातील 3 हजार महिला दुबईमध्ये अडकल्या; रुपाली चाकणकर यांची माहिती

कामाच्या आमिषाने या महिलांना दुबईमध्ये नेण्यात आले. ज्यानंतर त्यांचे कागदपत्र काढून घेतल्याचे सांगण्यात आले आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशिल थोरात...

Ahmednagar: महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार महिला दुबईमध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कामाच्या आमिषाने या महिलांना दुबईमध्ये नेण्यात आले. ज्यानंतर त्यांचे कागदपत्र काढून घेतल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतची धक्कादायक माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार महिला या ओमन आणि दुबईमध्ये अडकल्याचे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले आहे. या महिलांना कामाच्या आमिषाने दुबई आणि ओमनमध्ये नेण्यात आले. आणि त्यानंतर त्यांच्याकडील सर्व कागदपत्रे काढून घेण्यात आली, असेही रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले आहे. यामधील काही महिला अहमदनगर जिल्ह्यातील आहेत, असा खुलासा त्यांनी केलाआहे.

सध्या त्यांचा ठाव ठिकाणा लागत नसून काही महिलांनी संपर्क साधला असल्याचेही त्या म्हणाल्या. याबाबत आम्ही केंद्र सरकारकडे माहिती देऊन त्या महिलांना महाराष्ट्रात कसे आणता येईल याबाबत पाठपुरावा करुत असल्याची माहितीही रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी रुपाली चाकणकर यांनी लोकप्रिय लावणी डान्सरच्या व्हायरल चित्रफित प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये त्यांनी दोषींना कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरदेखील कडक कारवाई करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT