Nandurbar News  Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : रानात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत घडली भयंकर घटना

आरती जिऱ्या पावरा (वय 27) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

दिनू गावित

नंदुरबार : रानात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील आचपा शिवारात ही दुर्देवी घटना घडली आहे. आरती जिऱ्या पावरा (वय 27) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. आरती तिनसमाळ रस्त्यावर असलेल्या डोंगरात बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी ही घटना घडली. (Nandurbar Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील आचपा येथील जिऱ्या विल्या पावरा यांची 27 वर्षीय मुलगी आरती ही तिनसमाळ रस्त्यावर डोंगरदऱ्यात बकऱ्या चारायला गेली होती. त्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विजेच्या तारा तुटून जमीनीवर पडल्या होत्या.अशात आरती हिचा या तुटलेल्या ताराला स्पर्ष झाला आणि तिला विजेचा जोरदार धक्का बसला.

विजेचा जोरदार धक्का बसल्याने आरती हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिवार व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला. याबाबत मुलीचे वडील जिऱ्या पावरा यांच्या खबरी वरून धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत मुलीच्या परिवाराला शासनाने योग्य ती मदत करावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT