accident file news  saam tv
महाराष्ट्र

Jalna : जालन्यात रिक्षा-दुचाकीचा भीषण अपघात; 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, रिक्षा चालक फरार

जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर जवळ माल वाहतूक करणाऱ्या लोडिंग रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.

लक्ष्मण सोळुंके

Jalna news : जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर जवळ माल वाहतूक करणाऱ्या लोडिंग रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दोन्ही वाहनांची समोरा समोर जोरदार धडक झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली. गुरवारी सायंकाळी हा अपघात झाला. या अपघातात 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

लोडिंग रिक्षा आणि दुचाकीच्या भीषण अपघातात (Accident) 26 वर्षांच्या साजेद लालखा पठाणचा मृत्यू झाला. साजेद हा मांजरगाव, बदनापूर येथील रहिवाशी होता.

जालन्यातील (Jalna) बदनापूरच्या दिशेने जाताना समोरून येणाऱ्या लोडिंग रिक्षाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत साजेद गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी जालना शहरातील रुग्णालयात नेले.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या साजेदची प्रकृती गंभीर असल्याने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, घाटी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

साजेदच्या मृत्यूनंतर बदनापूर शहरासह मांजरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाता नंतर रिक्षा चालक रिक्षा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

पालघरमध्ये भीषण अपघातात 25 वर्षीय रायडरचा जागीच मृत्यू 

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच भीषण अपघातात बाईक रायडरचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. हा बाईक रायडर डहाणूमधील आंबोली येथे रायडिंगसाठी आपल्या मित्रासोबत आला होता. अपघातात त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनिमित्त शेकडो बाईक राईडर्स मुंबईहून पालघरमध्ये दाखल झाले होते. यामधीलच एका रायडरचा बाईक अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत पोलिसांची आंदोलक शेतकऱ्यांवर दडपशाही, शक्तिपीठ महामार्ग मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Haldi Yellow Saree Designs: हळदीला पिवळ्या रंगाची साडी का नेसतात? माहितीये का?

Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

SCROLL FOR NEXT