आर्थिक विवंचनेतुन वर्षभरात 25 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या! SaamTvnews
महाराष्ट्र

आर्थिक विवंचनेतुन वर्षभरात 25 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या!

एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. याच आर्थिक विवंचनेतुन तो आत्महत्येचा मार्ग पत्करू लागलाय. आज शेगाव मध्ये आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. याच आर्थिक विवंचनेतुन तो आत्महत्येचा मार्ग पत्करू लागलाय. आज शेगाव मध्ये आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. तर नागपूरात एका चालकानं आत्महत्येचा प्रयत्न केला. वर्षभरात 25 वर कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

हे देखील पहा :

एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात आहे. सरकारचं महामंडळाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं एसटी कर्मचारी शुद्ध आर्थिक अडचणीत आलाय. त्याला वेळेवर वेतन मिळत नाही. तुटपुंजा पगार तोही वेळेवर मिळत नाही. त्यामुळं एसटी कर्मचारी आत्महत्या करताहेत. गेल्या वर्षभरात 25 च्या वर कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आज सुद्धा शेगाव मध्ये एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली. तर नागपुराही एका कर्मचाऱ्यानं टॉवर वर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला.

सुदैवानं कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानानं अनर्थ टळला. या सर्व परिस्थिती वर उपाय म्हणजे एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य शासनात झालं पाहिजे. हीच मागणी कर्मचारी संघटनेनं लावून धरलीय.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनिकरण झाल्यास पुढील गोष्टी होतील :

- कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढीचा दर वाढेल

- महागाई भत्ता वाढेल

- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळेल

- घरभाडे वाढेल

- सुरक्षितता वाढेल

- खाजगी बसेस वर आळा बसेल

आगामी हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचारी संघटना विलीनीकरनाचा मुद्दा लावून धरणार आहे. यात त्यांना यश मिळतं का, त्यांच्या समस्या सुटतील का, हे बघणं महत्त्वाचे ठरेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: केस ओढले, लाथा बुक्क्यांनी मारहाण अन्....; विद्यापीठात विद्यार्थिनींचा राडा

Amruta Khanvilkar : नऊवारी पैठणी, हातात हिरवा चुडा अन्...; नव्या नवरीसारखी नटली अमृता खानविलकर, फोटोवरून नजर हटणार नाही

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

America Attack On Iran: अमेरिकेचा इराणवर आतापर्यंचा सर्वात मोठा हल्ला, 'ऑइल हब' असलेले खार्ग बेट उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT