sheep , pandharpur saam
महाराष्ट्र

Pandharpur News : सांगलीतील पशुपालकास माेठा धक्का, मंगळवेढ्यात 80 मेंढ्यांना विषबाधा; 24 मृत

भारत नागणे

Pandharpur News : मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी येथे चरण्यासाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील वासुदेव गोरडे या मेंढपाळाच्या 80 मेंढ्यांना विषबाधा झाली. त्यामध्ये 24 मेंढ्या ह्या मृत झाल्याने पशुपालक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

सांगली (sangli) जिल्ह्यातील वासुदेव गोरडे आपल्या मेंढ्या जगवण्यासाठी मंगळवेढ्यातील शेलेवाडी परिसरात मुक्कामी होते. या परिसरातील डाळिंब बागेत मेंढ्या चरल्याने रात्री अकराच्या सुमारास 24 मेंढ्या मृत अवस्थेत पडल्या. हे पाहिल्यानंतर गाेरडेंना माेठा धक्का बसला.

त्यांनी तातडीने पशू वैद्यकीय अधिकारी यांना बाेलावले. सुमारे 80 मेंढ्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यातील 24 मेंढ्या मृत पावल्या आहेत. या मेंढ्या डाळिंबाच्या बागेत चरण्यासाठी गेल्या होत्या. या बागेवर औषध फवारल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पशु वैद्यकीय अधिकारी (doctor) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

SCROLL FOR NEXT