Pandharpur News,  saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : नौका विहाराचा आनंद लुटण्यासाठी पंढरीत २०० होड्या सज्ज

आषाढीसाठी होडी घेऊन चंद्रभागेत कोळी बांधव सज्ज होताना दिसत आहेत.

भारत नागणे

Pandharpur News : आषाढी यात्रेचा (Ashadhi Wari 2023) पार्श्वभूमीवर चंद्रभागा तिरावरच्या कोळी बांधवांनी आपल्या होड्या अर्थात नौका दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा देखील भाविकांसाठी सशुल्क पंढरपुरात २०० होड्या यात्रा काळात सज्ज असतील असा विश्वास हाेडी चालक संघटनेने व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त लाखाे भाविक पंढरपूरला येत असतात. भाविकांची काेणतीही गैरसाेय हाेऊ नये यासाठी पंढरपूरात प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा मंदिर समितीने दर्शन रांगेसाठी गोपाळपूर रोडवरील मैदानावर दहा पत्र शेडची उभारणी केली आहे. प्रशासनाबराेबर स्थानिक व्यावसायिक देखील एकादशी निमित्त तयारी करीत आहेत. (Ashadhi Wari)

पंढरपूरात येणारे भाविक चंद्रभागा स्नाना सोबतच पुंडलिक मंदिर ते विष्णूपद तसेच नदीच्या पैलतिरावर जाण्यासाठी नौका विहाराचा आनंद घेत असतो. यासाठी पंढरपुरात २०० होड्या यात्रा काळात सज्ज असतात. सध्या या होड्यांची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे.

यामध्ये होड्यांना डाबर लावणे, पत्रा ठोकणे, लाकडे व्यवस्थित आहेत का ? याची तपासणी करणे अशी कामे केली जाताहेत. जेणेकरून नदीतील कुठल्याही प्रकारचे पाणी होडीत शिरू नये. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुरु असलेले हाेडी दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे असे गणेश अंकुशराव (अध्यक्ष , होडी चालक संघटना) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT