20 years life imprisonment to three culprit for molesting minor girl nandurbar Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरण; तिघांना 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, दहा हजार रुपयांचा दंड

या घटनेचा पाेलिसांनी देखील उत्तम तपास केला हाेता. नराधमांना न्यायालयाने शिक्षा सुनावताच न्याय मिळाल्याने बालिकेच्या आप्तवासियांना देखील अश्रु अनावर झाले हाेते.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

नंदुरबार जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात तिघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आराेपींना दहा हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. संबंधित मुलगी मतिमंद असल्याचा गैरफायदा नराधमांनी घेतला हाेता. त्यांना शिक्षा सुनावताच न्याय मिळाल्याने बालिकेच्या आप्तवासियांना देखील अश्रु अनावर झाले हाेते. (Maharashtra News)

सन 2019 कालावधीत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका 16 वर्षीय पिडीत बालिका मतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन 3 आरोपींनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत संधी साधून पिडीत मतिमंद बालिकेला एका नाल्याच्या पुलाखाली नेऊन तिचेवर सामुहिक बलात्कार केला.

या प्रकरणी गेली चार वर्ष न्यायालयात सुनावणी सुरु हाेती. या बालिकेला न्याय मिळाला असून अत्याचार करणाऱ्या तिन्ही नराधमांना जिल्हा सत्र न्यायालयाने वीस वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT