Jalamb Police Station संजय जाधव
महाराष्ट्र

Buldhana Crime: सासरच्या जाचाला कंटाळून 20 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

संजय जाधव

बुलढाणा - पतीसह सासरकडील मंडळीने लग्नात हुंडा दिला नाही या सह विविध कारणांनी शारिरीक व मानसिक छळ केला. त्यामुळे सासरच्या या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जलंब पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कठोरा येथे घडली आहे. तुला स्वयंपाकच येत नाही, जेवण जास्त करते असे वारंवार हिनवले. हुंडा मिळाला नाही म्हणून शारीरिक, मानसिक छळ केला. हा त्रास असहाय झाल्याने २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कठोरा येथे घडली आहे. (Latest Crime News Buldhana)

हे देखील पहा -

गळफास घेण्यापूर्वी विवाहितेने आपल्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करून सर्व घटना सांगितली आणि फासाचे फोटो काढून आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू, सासरा व दीराला जलंब पोलिसांनी अटक केली आहे. मेधा पवन वाघ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील देविदास राजुस्कर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यावरून पती पवन सुभाष वाघ, सासरा सुभाष वाघ, सासू महानंदा वाघ आणि दीर गणेश यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मेघा सासरी नांदत असताना पतीसह सासरच्यांनी तिला स्वयंपाक येत नाही. तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही. तुला शेतीचे काम येत नाही. जेवण जास्त करते असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. हा छळ असह्य झाल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तक्रारीत मेघाच्या वडिलांनी म्हटले आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय राहुल कातकाडे हे करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT