Osmanabad News Saam Tv
महाराष्ट्र

Osmanabad News : उरुसासाठी जमलेला गर्दीत वळू उधळला; चेंगराचेंगरीत २० भाविक जखमी, व्हिडिओ व्हायरल

जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

Osmanabad Latest News : उस्मानाबादमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. उरुसामध्ये वळू उधळल्यानं 20 भाविक जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेवेळी जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते. उरूस सुरू असताना अचानक वळू भाविकांमध्ये शिरला. या घटनेमुळे भाविकांची धावपळ उडाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 20 भाविक जखमी झाले आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

उरुसामध्ये वळू शिरला

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद (Osmanabad) शहरात सध्या हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरूस सुरू आहे. उरुसामध्ये सुरू असलेल्या धार्मिक कर्यक्रमाला तब्बल 15 हजार लोकांची उपस्थिती होती.

धार्मिक कार्यक्रम सुरू असताना पहाटे तीनच्या सुमारास अचानक एक अनियंत्रीत झालेल्या वळू भाविकांमध्ये शिरला. वळू उधळल्यानं भाविकांची धावपळ उडाली. यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 20 भाविक जखमी झाले आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पोलीस घटनास्थळी हजर

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांसोबत वैद्यकीय पथकही आले. पोलिसांनी (Police) गर्दीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT