Nandurbar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime News: शेतीच्या वादातून तुफान राडा, तलवारीने हल्ला करत गोळीबार; बाप-लेकाचा मृत्यू

2 People Dead After Firing In Nandurbar: जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Priya More

सागर निकवाडे , नंदूरबार

Nandurbar News: नंदुरबारमध्ये (Nandurbar) शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन भावांमध्ये झालेल्या तुफान राड्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वादादरम्यान गोळीबार करण्यात आला. त्याचसोबत तलवारीने वार देखील करण्यात आले होते. या घटनेमध्ये ४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहादा पोलिसांकडून (Shahada Police) या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे ही घडली आहे. शेतीच्या वाटणीवरुन दोन कुटुंबामध्ये वाद झाला. दोन चुलत भावांमध्ये झालेल्या वादानंतर तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान गावठी कट्यातून दोन राऊंड फायरिंग करण्यात आले. तसंत तलवारीने देखील वार करण्यात आले. गोळी लागल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या राड्यामध्ये गोळी लागल्यामुळे बाप-लेकांचा मृत्यू झाला आहे. तर चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर नंदुरबारच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर असून त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये आरोपीचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात PSI ला जामीन, पण बदनेपुढे ठेवल्या ३ अटी, 5 महिन्यांनी येणार तुरुंगाबाहेर

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Bank OTP: बँकेच्या OTP ची कटकट संपणार! व्हेरिफिकेशनसाठी नवीन प्रणाली लागू होणार | VIDEO

Pune : पुण्यात मोठी दुर्घटना! रिंग रोडच्या कामावेळी ऑपरेटरचा दुर्दैवी मृत्यू; कामगारामध्ये संतापाची लाट

Health Care: जेवणानंतर या 7 गोष्टी करणे ठरू शकते आरोग्यासाठी सर्वात मोठी चूक

SCROLL FOR NEXT