Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: नागपुरात खळबळ! झोपेत असताना शॉर्ट सर्किटमुळे घराला लागली आग, दोघांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू

Latest News: शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली असून सध्या इमामवाडा पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Priya More

Nagpur News: नागपूरमध्ये (Nagpur) घराला लागलेल्या आगीमध्ये गुदमरुन दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या इमामवाडा पोलिस ठाण्याच्या (Nagpur Police) हद्दीत ही घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली असून सध्या इमामवाडा पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये शॉट सर्किटमुळे घराला आग लागली. आगी लागल्यानंतर निघालेल्या धुरात गुदमरून दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूरच्या इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याठिकाणी असलेल्या आनंद पब्लिक स्कूलच्या बाजूला असलेल्या खोलीला आग लागली. त्यामध्ये राहत असलेल्या आकाश रजक आणि अमन तिवारी या दोघांचा मृत्यू झाला.

आकाश आणि अमन हे दोघेही मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. ते गेल्या काही महिन्यांपासून नागपूरमध्ये राहत होते. याठिकाणी ते फ्लेक्सची कामं करायचे. रविवारी त्यांच्या घरामध्ये असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाला. त्यानंतर घराला आग लागून धुराचे साम्राज्य झाले. यामध्ये गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. आकाश आणि अमनचे परिचित त्यांना भेटण्यासाठी घरी आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.

आग लागली त्यावेळी आकाश आणि अमन हे दोघेही गाड झोपेत असावे आणि धुरामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास नागपूर पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मोठी बातमी! पुण्याहून मुंबईला येणार्‍या सर्व एसटी बसेस रद्द, २१ तासांपासून एक्सप्रेस वे ठप्प, प्रवास टाळाच, कारण...

मी जातपात मानत नाही, माळी समाजाचा उल्लेख; अजितदादांनी मृत्यूआधी कॉलवर नाव घेतलेल्या नेत्याने सगळं काही सांगितलं

लोकसभेच्या गेटवर राडा! बघा गद्दार चालले; काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या मंत्र्याला राहुल गांधींनी डिवचले, मंत्री म्हणाले...,

Yoga Poses For Thyroid Problem: थायरॉईडवर सोपा उपाय, रोज घरीच करा ही 5 योगासने

Eyebrow Growth: केमिकल प्रॉडक्ट्स विसरा! दाट आणि सुंदर भुवयांसाठी करा हे 5 घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT