pune bangalore national highway accident news, gunkhi, road roller, car saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway Accident News : राेड राेलरला कारची धडक; पुणे-बंगळुर महामार्गावर दाेन ठार, चाैघे जखमी

हा अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीस धावले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : पुणे-बंगळुर महामार्गावर घुणकी फाटा (gunkhi phata) येथे राेड राेलरला कारची धडक बसल्याने दाेघांचा मृत्यू झाला आहे तर चाैघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (शनिवार) पहाटे साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची माहिती कळताच काेल्हापूर जिल्ह्यातील मिणचे, टाेप परिसरातील युवकांनी घुणकी फाटा येथे धाव घेतली. (Maharashtra News)

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन आणि पाेलीसांकडून मिळालेली माहिती अशी - मुंबईत टाेप, मिणचे येथील काही युवक कामासाठी गेले हाेते. मुंबईहून घरी परतताना घुणकी फाट्याजवळ किणी टोल नाकाच्या दिशेने चाललेल्या रोड रोलरला त्यांच्या कारची धडक बसली. या धडकेत रोडरोलर बाजूच्या रस्त्यावर जाऊन पलटी झाला तर कारचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.

या धडकेनंतर कारचे तोंड पुन्हा पुण्याच्या दिशेला झाले. या अपघातानंतर महामार्गावरील (Pune Bangalore National Highway Traffic Update) वाहतूक ठप्प झाली हाेती. हा अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीस धावले. या अपघातात दाेघे युवक ठार झाले तर चाैघे गंभीर जखमी झालेत. यामध्ये रोलर चालकाचा देखील समावेश आहे.

मिणचे, टाेप गावावर शाेककळा

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या अपघातात राहुल अशोक शिखरे(वय ३० रा.मिणचे) व सुयोग दत्तात्रय पवार (वय २८ रा.टोप) हे दाेघे जण ठार झाले आहेत. तसेच सुनील कुरणे (वय २४), वैभव चौगुले (वय २३ सर्व रा.टोप) अनिकेत जाधव (वय २२), निखिल शिखरे (वय २७) तसेच रोलर चालक दादासो दबडे (वय ४० रा वाठार) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : मैद्याचे पदार्थ ३० दिवस खायचे बंद करा, तुमच्या शरीरावर होईल 'हा' परिणाम

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

SCROLL FOR NEXT