Amravati News
Amravati News Saam Tv
महाराष्ट्र

अमरावतीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; २ बोगस डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या शेंदूरजना घाट येथे आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या (Police) मदतीने २ बोगस डॉक्टरांना (Doctor) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परवाना नसताना देखील बोगस डॉक्टर वैधकीय सेवा देत असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पाहा -

गेल्या अनेक महिन्यांपासून बोगस डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला मिळाल्या होत्या. यावरून आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई केली आहे. सद्या याबाबत पोलिसांनी २ बोगस डॉक्टरांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र वैधकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.

तरी देखील बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. त्यामुळे रुणांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने ठोस पाऊले उचलून यांच्यावर कडक कारवाई कारवाई करावी असा सूर परिसरातून उमटत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

Sambhajinagar News: प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची ‎कोयत्याने हत्या; शीर हातात घेऊन सेल्फी, मायलेकांना जन्मठेप

Special Report : नवी मुंबईत बनावट नोटांचा छापखाना

Pune News | पुण्यातील चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT