18 years Old Son Killed 36 Years Old Mother Shocking Incident In Vasai Taluka  Saam TV
महाराष्ट्र

Vasai Crime News: संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, मुलाने जन्मदात्या आईलाच संपवलं; खळबळजनक घटना

Son Killed Mother Vasai Crime News: चारित्र्यावर संशय घेत एका नराधम मुलाने जन्मदात्या आईची कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चेतन इंगळे

Son Killed Mother Vasai Crime News: चारित्र्यावर संशय घेत एका नराधम मुलाने जन्मदात्या आईची कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरात रविवारी (२० ऑगस्ट ) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

सुनीता सुनील घोघरा (वय ३६ वर्ष) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून वैभव घोघरा (वय १८ वर्ष) असं आरोपी मुलाचे नावं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही वसई तालुक्यातील (Vasai Crime News) देपिवली गावातील ग्रामपंचायत सदस्य होती.

गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली-देपिवली ग्रामपंचायत मधून मृत महिला सदस्य म्हणून निवडून आली होती. दरम्यान, मृत महिला वालिव परिसरात नोकरीला जात होती. आपल्या आईचे एका पुरूषासोबत प्रेमसंबंध आहे, असा संशय महिलेच्या मुलाला होता.

यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी आरोपी वैभव याने घरात झोपलेल्या आईवर कुऱ्हाडीने सपासप (Crime News) वार केले. घटनेनंतर तो पसार झाला.

दरम्यान, काही वेळानंतर वैभव याचे वडील घरी आले असता, त्यांना आपली पत्नी जखमी अवस्थेत आढळून आली.त्यांनी तातडीने उपचारासाठी पत्नीला भिवंडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सदर घटनेची नोंद मांडवी पोलिसात होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत मृत महिलेच्या मुलाची चौकशी केली असता, मी आईची हत्या केल्याचे त्याने कबुल केले. सदर आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे मांडवी पोलिस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

किडनी स्टोनच्या रुग्णांनी काय खावे आणि काय काय खाऊ नये?|Kidney Stone Diet Tips

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT